अनंत अंबानीच्या लग्नासाठी जगन्नाथ मंदिरातील सेवकाला मिळालं अनोखं निमंत्रण पत्र, पाहा व्हिडिओ - Invitaion To Ambani Wedding - INVITAION TO AMBANI WEDDING
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 4, 2024, 10:13 AM IST
पुरी Anant Ambani Wedding Invitation : उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलंय. अनंत अंबानी हा राधिका मर्चंटसोबत 12 जुलैला लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळं सध्या अनंत-राधिकाच्या लग्नाची तसंच त्यांच्या अनोख्या लग्नपत्रिकेची जोरदार चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. अनंत अंबानी यांच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण पत्र जगन्नाथ मंदिरातील सेवक आणि व्यवस्थापन समितीचे सदस्य जगन्नाथ कार यांना मिळालंय. हे आमंत्रणपत्र पूर्णपणे चांदीनं मढवलेले आहे. या आमंत्रण पत्रावर भगवान विष्णूचे चित्र असून ही केशरी पेटी उघडल्यावर, विष्णू मंत्र ऐकू येतो. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानी पुरी येथील जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांची देणगी मंदिराला दिली.