अमोल कीर्तिकर मतदार संघातील 9 वर्षाच्या विकास कामांच्या जोरावर मागणार मत; पाहा खास मुलाखत - Amol Kirtikar Interview - AMOL KIRTIKAR INTERVIEW

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : May 1, 2024, 10:00 PM IST

मुंबई Amol Kirtikar Interview : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) निमित्तानं राज्यातील वातावरण तापलं आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केलं जात आहे. यंदाची निवडणूक ही अतिशय आगळीवेगळी असून अनेक मतदारसंघात कुटुंबातच लढत पाहायला मिळत आहे. मुंबईतील उत्तर-पश्चिम मतदारसंघातून ठाकरे शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar), विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात लढत होणार आहे. याविषयी "ईटीव्ही भारत'शी अमोल कीर्तिकर यांनी संवाद साधलाय.



मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र वायकर अशी लढत होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मला उमेदवारी दिल्यानंतर माझ्यासमोर अनेक सेलिब्रिटी दिग्गजांची नावे येत होती. मात्र, आमचे जुने सहकारी रवींद्र वायकर यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यासोबत भावनिक नातं आणि राजकीय संबंध वेगळे आहेत. तसंच यापूर्वी मतदार संघात आम्ही दोन प्रचार फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. तर या लढाईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा विजय होणार असा विश्वास, अमोल कीर्तिकर यांना व्यक्त केलाय. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.