हैदराबाद : सॅमसंगनं 22 जानेवारी 2025 रोजी होणाऱ्या त्यांच्या गॅलेक्सी अनपॅक्ड कार्यक्रमाची अधिकृत घोषणा केली आहे. या इव्हेंटमध्ये त्यांचे नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन्स Galaxy S25, Galaxy S25+, Galaxy S25 Ultra लॉंच होणार आहेत. यात Galaxy S25 Slim कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात स्लिम स्मार्टफोन असण्याची अपेक्षा आहे. Galaxy S25 मालिकेच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, फोनची खरी किंमत लॉंचच्या वेळीच उघड केली जाईल. तथापि, गेल्या आठवड्यात लीक झालेल्या किंमतींवरून भारतातGalaxy S25 मालिकेची किंमत किती असेल यांचा अंदाज बांधता येऊ शकतो.
Galaxy S25 मालिकेची अपेक्षित किंमत
लीक झालेल्या माहितीनुसार, 128 जीबी स्टोरेज असलेल्या सॅमसंग Galaxy S25 च्या बेस मॉडेलची किंमत सुमारे 85 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. 256 जीबी व्हेरिएंटची किंमत सुमारे 91 हजार रुपये, 512 जीबी पर्यायासाठी सुमारे 1 लाख 1 हजार रुपये असण्याची अपेक्षा आहे. Galaxy S25+ 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 1 लाख 9 हजार रुपये पासून सुरू होण्याची शक्यता आहे. Galaxy S25+ च्या 512 जीबी व्हेरिंएटची किंमत सुमारे 1 लाख 20 रुपय असेल.
सॅमसंगची प्रीमियम ऑफर असलेल्या Galaxy S25 Ultraची किंमत खूपच जास्त आहे. बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत अंदाजे 1 लाख 38 हजार रुपये असण्याची अफवा आहे. 1 टीबी स्टोरेजसह टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत सुमारे 1 लाख 70 हजार रुपये असू शकते. गेल्या वर्षी लाँच झालेल्या Galaxy S24 series ची सुरुवातीची किंमत Galaxy S25 लाइनअपच्या तुलनेत थोडी कमी होती. Galaxy S24 च्या 8 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 79 हजार 999 रुपये होती, तर 8 जीबी + 512 जीबी मॉडेलची किंमत 89 हजार 999 रुपये होती.
Galaxy S24+ ची सुरुवातीची किंमत 12 जीबी + 256 जीबी व्हेरिएंटची किंमत 99 हजार 999 रुपये होती, जी 12 जीबी + 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 1 लाख 9 हजार 999 रुपये होती. दरम्यान, Galaxy S24 अल्ट्राच्या 12 जीबी+ 256 जीबी मॉडेलची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये, 12 जीबी+ 512 जीबी व्हेरिएंटची किंमत 1 लाख 39 हजार 999 रुपये आणि 12 जीबी+ 1 टीबी पर्यायाची किंमत 1 लाख 59 हजार 999 रुपये होती. मात्र, Galaxy S25 मालिकेतील फोनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Galaxy S24 मालिकेतील स्टोरेज पर्यायांची माहिती लीक झाली आहे. Galaxy S24 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी स्टोरेज पर्यायांमध्ये येण्याची अपेक्षा आहे. Galaxy S24+ 128 जीबी व्हेरिएंट यातून वगळू शकतो, तो फक्त 256 जीबी आणि 512 जीबी पर्यंत येऊ शकतो. दरम्यान, Galaxy S25 अल्ट्रामध्ये 1 टीबी पर्यंत स्टोरेज पर्याय असण्याची अफवा आहे.
प्री-रिझर्वेशन सुरू
Galaxy S25 मालिका खरेदी करण्यास उत्सुक असलेले भारतीय ग्राहक 1 हजार 999 रुपयांच्या शुल्कासह फोन आधीच बुक करू शकतात. तसंच, बुकिंग केल्यावर तुम्हाला 5 हजार रुपयांचे अतिरिक्त फायदे मिळतील. सॅमसंग त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे प्री-ऑर्डर करणाऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. आगऊ बुकिंग करणारे ग्राहक विशेष रंग पर्याय निवडू शकतात, रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशन कस्टमाइझ करू शकतात.
हे वाचलंत का :