चक्क धुरीकरण मशीन घेऊन अमोल बालवडकरांनी केलं आंदोलन, काय आहे कारण? - Amol Balwadkar - AMOL BALWADKAR
🎬 Watch Now: Feature Video
Published : Sep 9, 2024, 10:53 PM IST
पुणे Amol Balwadkar : पुणे शहरात डेंगू, चिकनगुनिया, झिका आणि मलेरियाची साथ सुरू आहे. कोथरूड भागामध्ये या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र पुणे पालिकेकडून या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य प्रकारे काळजी घेत घेतली जात नसल्यामुळं 'झोपेचे सोंग' घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी चक्क महापालिकेत धुरीकरण मशीन घेऊन महापालिका परिसरात धुरीकरण करून त्यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं. आता तरी प्रशासन जागे होऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेईल अशा संतापजनक भावना अमोल बालवडकर यांनी यावेळी व्यक्त केली.
आजारांचा प्रादुर्भाव वाढला : कोथरूड परिसरात डेंगू, मलेरिया, झिका,चिकनगुनिया यासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव गेल्या महिन्याभरापासून वाढला आहे. याबाबत पालिकेकडून योग्य उपाय योजना केल्या जात नसल्यामुळं महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोऱ्हाडे यांची अमोल बालवडकर यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्याशी रुग्णांना आरोग्य सेवेमध्ये होत असलेल्या गैरसोयीबाबत चर्चा केली. त्यापूर्वी त्यांनी महापालिका परिसरात धुरीकरण करून पालिकेच्या निष्काळजी कारभाराचा निषेध देखील केला.