दीक्षाभूमीवर तणावपूर्ण शांतता; बंदोबस्तामुळं छावणीचं स्वरूप, सर्व रस्ते बंद - Nagpur Deekshabhoomi
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमीच्या परिसरात सुरू असलेल्या भूमिगत पार्किंगचा वाद आणखी चिघळू नये, यासाठी आज संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दीक्षाभूमीवर सोमवारी भीम अनुयायांचा प्रक्षोभ उसळला होता. त्यामुळं आज दीक्षाभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दीक्षाभूमीकडं येणाऱ्या सर्वच मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. कुणाला ही ओळखपत्राशिवाय दीक्षाभूमीकडं सोडण्यास मनाई करण्यात आलीय. सोबतच दीक्षाभूमीचं मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आलं आहे. कोणालाही दीक्षाभूमीमध्ये प्रवेश देण्यास बंदी करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून पोलीस अलर्टवर आहेत.
सोमवारच्या घटनेचा तपास सुरू : दीक्षाभूमीवर झालेल्या सोमवारच्या घटनेत नागपूर बाहेरील लोकांचा जास्त समावेश असल्याची बाब तपासात उघड झाल्याची माहिती, नागपूरचे सहपोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांनी दिलीय. घटनेची चौकशी सुरू असून घटनेसाठी जबाबदार असलेल्यांच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात येतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.