अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने पुण्यात बजावला मतदानाचा हक्क - Sonali Kulkarni voting - SONALI KULKARNI VOTING
🎬 Watch Now: Feature Video
Published : May 13, 2024, 12:51 PM IST
पुणे - वाढत्या उन्हाचा तडाखा सर्वत्र नागरिकांना बसत असला तरी पिंपरी - चिंचवड परिसरातील अनेक ठिकाणी मतदानास येणाऱ्या नागिरकांसाठी भव्य असा मंडप , फुग्याची आकर्षक कमान, ठिकठिकाणी फँन, थंडगार पाण्याची सोय करण्यात आल्याने नागरिकांनी कौतुक केलं आहे. पुणे शहरात मतदानाची टक्केवारी घसरल्याने नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदानास यावे, या उद्देशाने महाविदयालयाने स्वःखर्चातुन मंडप, फुग्याची कमान, शालेय विद्यार्थी हे स्वयंसेवकाची भूमिका पार पडताना येथे दिसत असल्याने निवडणुक कर्मचा-यांनाही याचा फायदा होत आहे.
दरम्यान निगडी येथील विद्याप्रतिष्ठानच्या महाविदयालयात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने कुंटूबियासह मतदानाचा हक्क बजावला आणि निवडणुक आयोगाने सुरु केलेल्या सेल्फि विथ वोट या मोहिमेत सहभागी होऊन मतदान करण्याचे आवाहन सोनालीने केले.
हेही वाचा -
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आवर्जुन मतदान करण्याचं सुबोध भावेचं कळकळीचं आवाहन - Lok Sabha election 2024