अलिबागच्या समुद्रात भरकटलेल्या जहाजावर अडकले 14 जण, बचावकार्य सुरू; पाहा व्हिडिओ - Raigad Ship Stuck in Sea - RAIGAD SHIP STUCK IN SEA
🎬 Watch Now: Feature Video
Published : Jul 26, 2024, 12:56 PM IST
रायगड Raigad Ship Stuck in Sea : अलिबाग समुद्रात भरकटलेल्या जहाजावरील खलाशांचं बचाव कार्य सुरू आहे. तटरक्षक दलाच्या हेलीकॉप्टरनं खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणलं जात असून या जहाजावर एकूण 14 खलाशी अडकून पडलेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (25 जुलै) एस डब्लू कंपनीचं मालवाहू जहाज धरमतर खाडीतून जयगडकडं निघालं होतं. मात्र, काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळं भर समुद्रात हे जहाज बंद पडलं. दरम्यान, आज (26 जुलै) सकाळपासूनच अलिबागच्या कुलाबा किल्ल्याजवळ भरकटून बंद पडलेल्या जे एस डब्ल्यू कंपनीच्या जहाजावरील खलाशांचं बचावकार्य सुरू करण्यात आलं असून कामगारांना हेलिकॉप्टर च्या साहाय्यानं अलिबाग समुद्र किनारी आणून सोडण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलीय.