नवी दिल्ली UPI transactions : चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या पाच महिन्यांत (एप्रिल-ऑगस्ट) डिजिटल पेमेंटचं मूल्य 1,669 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. या कालावधीत डिजिटल पेमेंट व्यवहारांची संख्या ८,६५९ कोटींवर पोहोचल्याचं केंद्रीय अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. आकडेवारीनुसार, UPI व्यवहारांचं मूल्य 2017-18 मध्ये 1 लाख कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 200 लाख कोटी रुपयांपर्यंत 138 टक्के CAGR (वार्षिक वृद्धी दर) पोहचंलय. याव्यतिरिक्त, UPI व्यवहारांचं मूल्य गेल्या 5 महिन्यांत (एप्रिल-ऑगस्ट आर्थिक वर्ष 2024-25) 101 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहचलंय.
डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ : अर्थ मंत्रालयानं शुक्रवारी एका निवेदनात म्हटलं आहे की, भारतात डिजिटल पेमेंटमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डिजिटल पेमेंट व्यवहारांची एकूण संख्या आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 2,071 कोटींवरून 2023-24 मध्ये 18,737 कोटी झाली. मंत्रालयाने सांगितलं की, "चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या शेवटच्या 5 महिन्यांत (एप्रिल-ऑगस्ट) व्यवहारांची संख्या 8,659 कोटींवर पोहोचली आहे. 11 टक्के CAGR सह व्यवहारांचं मूल्य 1,962 लाख कोटी रुपयांवरून 3,659 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलं आहे. याशिवाय, चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या शेवटच्या 5 महिन्यांत (एप्रिल-ऑगस्ट) एकूण व्यवहार मूल्य 1,669 लाख कोटी रुपये झालं आहे.
UPI ने डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती : UPI हा भारताच्या डिजिटल पेमेंट इकोसिस्टमची आधारशिला आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, UPI नं देशात डिजिटल पेमेंटमध्ये क्रांती आणली आहे. UPI व्यवहार 2017-18 मध्ये 92 कोटींवरून 129 टक्के CAGR सह FY 2023-24 मध्ये 13,116 कोटीपर्यंत वाढले आहेत. UPI सारख्या जलद पेमेंट सिस्टमचा अवलंब करण्याच्या प्रयत्नांमुळं आर्थिक व्यवहार चालवण्याच्या पद्धतीत क्रांती झाली आहे. ज्यामुळं लाखो लोकांसाठी रिअल-टाइम, सुरक्षित, पेमेंट सक्षम झालं आहे. इतर देशांमध्ये भारताच्या डिजिटल पेमेंटच्या विस्तारावर प्रकाश टाकताना मंत्रालयानं म्हटलं की UPI आणि RuPay दोन्ही जागतिक स्तरावर वेगानं विस्तारत आहेत. यामुळं परदेशात राहणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी सीमापार व्यवहार करणं शक्य होत आहे. सध्या सात देशांमध्ये UPI कार्यरत आहे. यामध्ये UAE, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, मॉरिशस या प्रमुख बाजारपेठांचा समावेश आहे. याद्वारे भारतीय ग्राहक, व्यवसाय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेमेंट करू शकतात.
हे वचालंत का :