ETV Bharat / technology

दिवाळीपूर्वी TVS चा धमाका ! TVS Raider 125 iGo नवीन तंत्रज्ञानासह लॉंच, 5.8 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग - TVS RAIDER 125 LAUNCHED

भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक TVS मोटर्सनं TVS Raider 125 iGo नवीन तंत्रज्ञानासह (TVS Raider 125 iGo Launched) लाँच केलीय. त्यात काय फिचर आहे जाणून घेऊया...

TVS Raider 125 iGo Launched
TVS Raider 125 iGo (TVS)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 25, 2024, 10:25 AM IST

Updated : Oct 25, 2024, 10:30 AM IST

हैदराबाद TVS Raider 125 iGo launched : बाजारात अनेक सेगमेंटमध्ये बाईक आणि स्कूटर ऑफर करणाऱ्या TVS मोटर्सनं TVS Raider 125 iGo ची 125 cc मध्ये नवीन आवृत्ती लॉन्च केली आहे. कंपनीनं या दुचाकीत कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं आहे? बाइकमध्ये कोणत्या प्रकारचे फीचर्स आहेत? तिची किंमत किती आहे? चला जाणून घेऊया...

TVS Raider 125 iGo Launched (TVS)

TVS Raider 125 iGo ची नवीन आवृत्ती लाँच : TVS Raider 125 नवीन आवृत्तीसह लॉंच करण्यात आली. कंपनीनं यात दुचाकीत कंपनीनं नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलाय. त्यामुळं ही बाईक आपल्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान बाइक बनली आहे. TVS नं 10 लाख युनिट्सच्या विक्री केल्यानंतर ही दुचाकी लॉंच करण्यात आलीय. TVS नं Raider 125 मध्ये iGO तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. iGO असिस्ट रायडरला बूस्ट मोड, फर्स्ट-इन-सेगमेंट वैशिष्ट्यासह केवळ 5.8 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग वाढविण्यास सक्षम करते, असं कंपनीचं म्हणणे आहे. याव्यतिरिक्त, इंधन कार्यक्षमतेत 10 टक्के सुधारणा करण्यात आली.

इंधन कार्यक्षमतेमध्ये 10 टक्के सुधारणा : याबाबत TVS मोटर्सचे कॉम्प्युटर बिझनेस हेड अनिरुद्ध हलदर म्हणाले, TVS Raider अधिक चांगली झाली आहे. सेगमेंटमध्ये प्रथमच, बूस्ट मोड अतिरिक्त 0.55 न्यूटन मीटर टॉर्क प्रदान मिळतंय. इंधन कार्यक्षमतेमध्ये 10 टक्के सुधारणा झालीय. नवीन पिढीतील रायडर्स वेग आणि मायलेजला सर्वाधिक महत्त्व देतात. नवीन TVS Raider या दोन्ही गोष्टींमध्ये उत्कृष्ट आहे. याव्यतिरिक्त, लाल मिश्रधातूंसह आकर्षक नार्डो ग्रे रंग आमच्या रायडर्ससाठी महत्वाचा आहे. आमच्या रायडर्सना खूश करण्यावर आमचा सतत भर असतो.

काय आहेत फिचर? : कंपनीनं यात अनेक चांगले फिचर्स दिले आहेत. बाईकच्या नवीन प्रकारात TVS SmartXonnect™ तंत्रज्ञान देण्यात आलं आहे, ज्याला व्हॉईस असिस्ट आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारख्या 85 पेक्षा जास्त ब्लूटूथ कनेक्ट केलेल्या वैशिष्ट्यांसह नवीन रिव्हर्स एलसीडी क्लस्टर मिळतो. राईड रिपोर्ट आणि मल्टिपल राइडिंग मोड्स सारखे फीचर्सही यामध्ये देण्यात आले आहेत. बाइकला 5-स्टेप ॲडजस्टेबल मोनो-शॉक सस्पेंशन, लो फ्रिक्शन फ्रंट सस्पेन्शन आणि स्प्लिट सीट देखील मिळतं.

TVS Raider 125 इंजिन : TVS च्या Raider 125 च्या नवीन प्रकारात 124.8 cc क्षमतेचं एअर आणि ऑइल कूल्ड 3V इंजिन देण्यात आलं आहे. यामुळं बाईकला 8.37 किलोवॅटची ताकद मिळते. TVS Raider 125 Performance. यात 5-स्पीड गिअरबॉक्स आहे आणि त्यासोबत 17-इंचाचे टायर देण्यात आले आहेत.

TVS Raider 125 किंमत : TVS Raider 125 चा नवीन प्रकार कंपनीनं 98 हजार 389 रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉंच केलीय. बाजारात त्याची थेट स्पर्धा नुकत्याच लाँच झालेल्या बजाज पल्सर N125, Hero Xtreme 125, Honda Shine 125, SP125 यांसारख्या बाइक्सशी असेल.

हे वाचलंत का :

  1. रिलायन्स इंडस्ट्रीजची NVIDIA सोबत भागिदारी, पायाभूत AI सुविधा विकसित करणार
  2. Apple नं iOS 18.2 ची पहिली बीटा आवृत्तीची घोषणा केलीय
  3. सायबर फसवणूक प्रकणात पोलिसांना मोठं यश, 84 वर्षीय वृद्धाला 53 लाख रुपये दिले परत

Last Updated : Oct 25, 2024, 10:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.