ETV Bharat / technology

Samsung Galaxy M05 भारतात 8 हजारात लॉन्च, 50 मेगापिक्सेल कॅमेरा - Samsung Galaxy M05 launched

author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 13, 2024, 12:31 PM IST

SAMSUNG GALAXY M05 LAUNCHED : सॅमसंगनं भारतात परवडणारा स्मार्टफोन Galaxy M05 लॉन्च केलाय. या फोनमध्ये सॅमसंगनं 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलाय. ॲमेझॉन आणि इतर रिटेल स्टोअरमधून फोन ऑनलाइन खरेदी करता येईल.

Samsung Galaxy M05
Samsung Galaxy M05 (Samsung)

हैदराबाद SAMSUNG GALAXY M05 LAUNCHED : सॅमसंगनं आपल्या M-Series चा नवीनतम एंट्री-लेव्हल स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy M05 हा कंपनीचा नवीन फोन आहे. यात 4 GB RAM, 64 GB स्टोरेज तसंच 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी देखील आहे. Samsung Galaxy M05 स्मार्टफोनमध्ये काय खास आहे? किंमत काय आहे? कोणते फिचर मिळणार आहेत, याबाबत माहिती जाणून घ्या...

Samsung Galaxy M05 ची भारतात किंमत : Samsung Galaxy M05 स्मार्टफोन भारतात 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट 7 हजार 999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. फोन मिंट ग्रीन कलरमध्ये येतो. हा हँडसेट सॅमसंगच्या वेबसाइट, Amazon India आणि निवडक रिटेल स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Samsung Galaxy M05 फिचर : Samsung Galaxy M05 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंच HD+ (720×1,600 pixels) PLS LCD डिस्प्ले आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 प्रोसेसर आहे. डिव्हाइसमध्ये 4GB रॅम, 64GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवता येते. सॅमसंगच्या रॅम प्लस फिचरसह, रॅम 8GB पर्यंत वाढविली जाऊ शकते. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो.

5000mAh मोठी बॅटरी : या सॅमसंग फोनला चार्ज करण्यासाठी 5000mAh मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये फेस अनलॉक सपोर्ट देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये एक्सीलरोमीटर, लाईट सेन्सर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर आहे.

कॅमेरा सेटअप : Samsung Galaxy M05 मध्ये अपर्चर F/1.8 सह 50 मेगापिक्सेल प्राइमरी आणि अपर्चर F/2.4 सह 2 मेगापिक्सेल सेकंडरी रिअर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी डिव्हाइसमध्ये 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, डिव्हाइसमध्ये 4G, Wi-Fi 802.11a/b/g/n/ac, GPS, ब्लूटूथ, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि USB टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. सॅमसंग, वनप्लस मोबाईलच्या खरेदीवर 30 हजारांची सूट - Foldable Phone Offers
  2. Lava चा पहिला Vibe Light 5G स्मार्टफोन, फोनच्या स्पेसिफिकेशन्ससोबतच स्पेशल किंमत माहिती - Lava Blaze 3 5G
  3. Vivo T3 Ultra 5G भारतात लॉंच, फोनमध्ये काय खास? - Vivo T3 Ultra 5G

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.