ETV Bharat / technology

सॅमसंगची पहिली स्मार्ट रिंग भारतात लाँच, तुमच्या हेल्थची घेणार काळजी

Samsung first smart ring launch : सॅमसंगची पहिली स्मार्ट रिंग भारतात लाँच झालीय. सॅमसंग गॅलेक्सी रिंगच्या किंमतसह जाणून घेऊया फिचर...

Samsung first smart ring launch
सॅमसंगची पहिली स्मार्ट रिंग (Samsung)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Oct 18, 2024, 7:48 AM IST

हैदराबाद Samsung first smart ring launch : सॅमसंग इंडियानं भारतात आपली पहिली स्मार्ट रिंग लॉन्च केली. कंपनीनं सॅमसंग गॅलेक्सी रिंग किंमत 38 हजार 999 रुपय ठेवली आहे. ही रिंग सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइट, Amazon आणि Flipkart सह निवडक रिटेल स्टोअर्सवर भारतात विक्रीसाठी उपलब्ध असेल.

फ्री EMI : सॅमसंग गॅलेक्सी रिंग ही देशात उपलब्ध असलेल्या सर्वात महागड्या स्मार्ट रिंगांपैकी एक आहे. म्हणूनच सॅमसंग या वेअरेबल गॅझेटसाठी 24-महिन्यांचा फ्री EMI ऑफर करत आहे. त्यामुलं रिंग 1 हजार 625 रुपये प्रति महिना उपलब्ध असेल. याशिवाय, सॅमसंग 18 ऑक्टोबर 2024 पर्यंत गॅलेक्सी रिंग खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 25W ट्रॅव्हल ॲडॉप्टर देखील देत आहे.

तीन रंगात उपलब्ध : सॅमसंगची नवीन स्मार्ट रिंग टायटॅनियम ब्लॅक, टायटॅनियम सिल्व्हर आणि टायटॅनियम गोल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसंच रिगं नऊ वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहे. पारंपारिक अंगठीसारखा रिंगचा आकार आहे. डिव्हाइस खरेदी करण्यापूर्वी ग्राहक सर्वोत्तम फिट असल्याची पुष्टी करण्यासाठी सॅमसंगकडून आकारमान किट देखील घेऊ शकतात.

10ATM रेटिंग : विशेष बाब म्हणजे गॅलेक्सी रिंग खूपच हलकी आहे. तिचा सर्वात लहान आकार फक्त 2.3 ग्रॅम आहे. त्याची रुंदी 7.0 मिमी आहे. सर्वात मोठ्या आकाराच्या गॅलेक्सी रिंग्सचं वजन 3 ग्रॅम पर्यंत आहे. रिंगला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP68 रेटिंग दिलंय. तसंच रिंग 10ATM रेटिंगसह 100 मीटर पाण्याच्या खोलीपर्यंत टिकू शकते.

'प्रगत सेन्सर्स' : Galaxy Ring मध्ये 24/7 आरोग्य देखरेखीसाठी 'प्रगत सेन्सर्स' वैशिष्ट्यीकृत आहेत. वापरकर्त्याच्या जीवनशैलीच्या नमुन्यांबद्दल AI-संचालित अंतर्दृष्टी प्रदान करण्यात आणि त्यांचं आरोग्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात मदत करते. सबस्क्रिप्शनची गरज न पडता स्मार्ट रिंगमधील डेटा सॅमसंग हेल्थमध्ये सेव केला जाऊ शकतो. यात झोपेचं विश्लेषण देखील समाविष्ट आहे. ज्यामध्ये झोपेदरम्यानची क्रिया, झोपेचा विलंब, हृदय आणि श्वसन दर आणि घोरण्याचे विश्लेषण तसंच असं बरंच काही समाविष्ट आहे.

हे वाचलंत का :

  1. Google Pixel 9 Pro ची प्री ऑर्डर सुरू, 10 हजारांच्या सूटसह 12 महिन्यांपर्यंत EMI फ्री
  2. स्पेक्ट्रम वाटपावरून इलॉन मस्क यांचा अंबानींवर निशाना
  3. Redmi A4 5G : स्नॅपड्रॅगन 4s Gen 2 प्रोसेसर असलेला भारतातील पहिला फोन, 10 हजारांपेक्षा कमी किंमत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.