ETV Bharat / technology

Redmi K80 सीरीज 27 नोव्हेंबरला होणार लॉंच, दमदार कॅमऱ्यासह जबरदस्त फीचर - REDMI K80 PRO SMARTPHONE SERIES

Redmi K80 सीरीज लवकरच लॉंच होणार आहे. यामध्ये K80 आणि K80 Pro फोन लॉंच केले जातील. जाणून घ्या या फोनमध्ये काय आहे खास?

Redmi K80 Pro smartphone series l
Redmi K80 सीरीज (Redmi)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 25, 2024, 10:33 AM IST

हैदराबाद Redmi K80 Pro : Redmi K80 Pro स्मार्टफोन लवकरच 27 नोव्हेंबरला चीनमध्ये लॉंच होऊ शकतो. या फोनमध्ये 2K M9 OLED फ्लॅट स्क्रीन, 6000mAh बॅटरी आणि Snapdragon 8 Elite SoC आहे. Redmi K80 Pro स्मार्टफोनचे लॉंच होण्यापूर्वीचं स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. कॅमेरापासून बॅटरीपर्यंत सर्वकाही जाणू घ्या, या बातमीतून....

Redmi K80 Pro : Xiaomi नं त्याच्या आगामी स्मार्टफोन Redmi K80 Pro च्या बॅटरी आणि कॅमेरा वैशिष्ट्यांची पुष्टी केली आहे. हा फोन आपल्या दमदार फीचर्स आणि नवीन तंत्रज्ञानासह बाजारात येण्यासाठी सज्ज आहे. या फोनच्या फीचर्सवर एक नजर टाकूया.

Redmi K80 Pro : फीचर Redmi K80 Pro मध्ये 6000mAh बॅटरी आहे, जी त्याच्या आधीच्या मॉडेल K70 Pro च्या 5000mAh बॅटरीपेक्षा जास्त क्षमतेची आहे. हा स्मार्टफोन 120W सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो आणि 50W वायरलेस चार्जिंग सुविधा देखील देतो. या फोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा आहे, जो लाइट फ्यूजन 800 सेन्सर वापरतो. याशिवाय, यात 32MP 120° अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो कॅमेरा आहे, ज्यामध्ये 10cm मॅक्रो पर्याय देखील आहे.

2K M9 OLED फ्लॅट स्क्रीन : डिस्प्लेबद्दल बोलायचं झाल्यास, Redmi K80 Pro मध्ये 2K M9 OLED फ्लॅट स्क्रीन आहे, ज्याची ग्लोबल पीक ब्राइटनेस 1800 nits पर्यंत आहे. फोनचा 6.67-इंचाचा डिस्प्ले 3200×1440 रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याच्या डिझाइनमध्ये 1.9mm अल्ट्रा-नॉरो चीन आणि मेटल फ्रेम समाविष्ट आहे.

Snapdragon 8 Elite चीप : कंपनीनं दावा केला आहे की हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite SoC आणि D1 गेमिंग चिपसह सादर केला जाईल. यासोबतच या फोनमध्ये ड्युअल-लूप 3D आइस कूलिंग सिस्टम आणि रेज इंजिन 4.0 असेल, जे सर्व गेममध्ये 120fps सुपर-रिझोल्यूशन आणि सुपर-फ्रेम कॉन्करन्सी प्रदान करेल. याशिवाय, या आगामी फोनला IP68 आणि IP69 रेटिंगसह डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स देण्यात आला आहे. तसंच, हे Xiaomi Dragon Crystal Glass 2.0 नं सुसज्ज आहे.

हे वाचलंत का :

  1. POCO F7 आणि POCO F7 अल्ट्रा लवकरच लॉंच केले जाऊ शकतात,
  2. Vivo X200 मालिका लवकरच भारतात होणार लॉंच; Vivo नं 'X' वर दिली माहिती, काय असतील फीचर
  3. Honor 300 स्मार्टफोनचं डिझाइन, रंग पर्याय आले समोर, चार रंगात येणार फोन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.