हैदराबाद : जगातील सर्वात मोठी चिप निर्माता कंपनी Nvidia नं स्थानिक AI मॉडेल जनरेशनला चालना देण्यासाठी भारतात एक नवीन लहान भाषा मॉडेल लाँच केलं आहे. विशेष म्हणजे, हे मॉडेल हिंदीमध्ये उपलब्ध झालं आहे. ते इंग्रजी किंवा इतर कोणत्याही जागतिक भाषेत सध्या तरी उपलब्ध नाही. देशात हिंदी भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. त्यामुळं AI चा नागरिकांना फायदा होईल, असा कंपनीचा दावा आहे.
अमेरिकन सेमीकंडक्टर चिप निर्माता Nvidia चे प्रमुख जेन्सेन हुआंग यांनी 24 ऑक्टोबर रोजी सांगितलं की रिलायन्स इंडस्ट्रीज आणि Nvidia भारतात AI पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी भागीदारी करत आहेत. Nvidia नं हिंदी AI मॉडेल देखील लाँच केलंय.
India’s innovators are developing sovereign AI #LLMs built on local datasets.
— NVIDIA Asia Pacific (@NVIDIAAP) October 24, 2024
Learn how #NVIDIANIM is supporting these initiatives with a microservice for Hindi, already in use by @tech_mahindra to develop its own regional model. https://t.co/7JyqC4ObWD#AISummit India pic.twitter.com/l27SaVjUAu
रिलायन्सचे चेअरमन अंबानी म्हणाले, जिओने टेलिकॉममध्ये ज्याप्रमाणे चांगल्या दर्जाची एआय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी एनव्हीडियावर विश्वास ठेवत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोघांनी भारतात एआय सुपर कॉम्प्युटर विकसित करण्याबाबत चर्चा केली होती.
हिंदीमध्ये संभाषण करण्याची परवानगी : Nvidia चे Nemotron 4 Mini Hindi 4B तुम्हाला हिंदीमध्ये संभाषण करण्याची परवानगी देतंय. Nemotron 4 Mini Hindi 4B हे 4 अब्ज पॅरामीटर्सवर बनवलेलं लहान भाषेचं मॉडेल आहे. एआय मॉडेलवरून वापरकर्ते हिंदी तसंच इंग्रजीमध्ये चॅट करू शकतात. भाषेच्या अडथळ्यामुळं ज्यांनी वापरकर्त्यांनी आत्तापर्यंत एआय मॉडेल्सचा वापरण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी आहे.
AI हिंदीमध्ये देणार उत्तरे : या मॉडेलवर तुम्ही देशाच्या कृषी प्रगतीविषयी, शेती, शिक्षण, आरोग्याविषयी प्रश्न विचारू शकतात. त्यावर निमोट्रॉन-४-मिनी-हिंदी-४बी AI तुम्हाला उत्तरे देईल. यासह, Nvidia त्यांच्या ॲप्स आणि सेवांमध्ये हे मॉडेल वापरण्याची शक्यता आहे. "मॉडेलला जगातील हिंदी डेटा, सिंथेटिक हिंदी डेटा आणि समान प्रमाणात इंग्रजी डेटाच्या संयोजनासह प्रशिक्षित केल आहे," असं एका निवेदनात म्हटलं आहे.
AI मॉडेलवर लक्ष केंद्रित : भारतीय आयटी सेवा आणि सल्लागार कंपनी टेक महिंद्रा ही इंडस 2.0 नावाचं कस्टम एआय मॉडेल विकसित करण्यासाठी NVIDIA ऑफरचा वापर करणारी पहिली कंपनी आहे. भारतात 1.4 अब्ज लोकसंख्येपैकी फक्त एक दशांश लोक इंग्रजी बोलतात. भारतात संविधानानं 22 भाषांना मान्यता देलीय. मोठ्या कंपन्यांपासून ते स्टार्टअप्सपर्यंत, भारतातील कंपन्यानी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी AI मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं आहे.
हे वाचलंत का :