हैदराबाद NEW 2024 YAMAHA R15M LAUNCHED : Yamaha R15M भारतात लॉन्च करण्यात आली आहे. दोन रंग पर्यायांमध्ये ही दुचाकी उपलब्ध आहे. मेटॅलिक ग्रे आणि आयकॉन परफॉर्मन्स असे यात दोन रंग आहेत. यासोबतच यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल आणि मागील नंबर प्लेटसाठी एलईडी लाईट अशी नवीन फिचर देण्यात आली आहेत. Yamaha R15M फिचर बद्दल जाणून घेऊया...
Yamaha R15M नवीन रंग पर्याय : Yamaha R15M ला नवीन रंगसंगती देण्यात आली आहे. हे इतर मॉडेल्सप्रमाणेच राखाडी रंगात आहे, परंतु फेअरिंगवर काळ्या पॅचऐवजी, त्यास फिनिशसारखे पप कार्बन-फायबर दिले गेलं आहे. यासोबतच त्याच्या इन्स्ट्रुमेंट कन्सोलमध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन रीडआउटची सुविधा देण्यात आली आहे. इतकंच नाही तर यामाहा स्मार्टफोन ॲपच्या माध्यमातून म्युझिक कंट्रोल्स ॲक्सेस करता येणार आहे.
Yamaha R15M इंजिन : नवीन Yamaha R15M च्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यात अजूनही 155cc लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे व्हेरिएबल-व्हॉल्व्ह ऍक्च्युएशनसह येते. त्याचं इंजिन 18.4PS आणि 14.2Nm टॉर्क जनरेट करतं. यात ट्रॅक्शन कंट्रोल, अपशिफ्टसाठी क्विकशिफ्टर आणि स्लिपर क्लच आहे.
Yamaha R15M किंमत : नवीन Yamaha R15M भारतात नवीन किंमतीसह लॉन्च करण्यात आली आहे. त्याच्या मेटॅलिक ग्रे कलर स्कीमची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 98 हजार 300 रुपये आहे. तर, आयकॉन परफॉर्मन्स व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2 लाख 8 हजार 300 रुपये आहे. किंमत आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत, ही बाईक R15M, Hero Karizma XMR, Suzuki Gixxer SF 250 आणि KTM RC 200 सारख्या मोटरसायकलशी स्पर्धा करेल.
'हे' वाचलंत का :