ETV Bharat / technology

Netflix scam : नेटफ्लिक्सच्या नावानं 23 देशांत मोठा घोटाळा, बनावट SMS द्वारे बँक तपशीलाची चोरी

Netflix scam : नेटफ्लिक्सच्या नावावर 23 देशांमध्ये मोठा घोटाळा सुरू आहे. हॅकर्स बनावट एसएमएसद्वारे बँक तपशील चोरत आहेत.

Netflix scam
नेटफ्लिक्स घोटाळा (Netflix)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 2, 2024, 3:15 PM IST

हैदराबाद Netflix Subscription Scam : नेटफ्लिक्सच्या नावानं नेटफ्लिक्स सबस्क्राइबर्ससोबत एक नवीन सायबर फसवणूक होत आहे. अनेकांनी वापरकर्त्यांना या घोटाळ्याबद्दल सतर्क केलं आहे. या घोटाळ्याअंतर्गत सायबर ठग वापरकर्त्यांना बनावट एसएमएस पाठवून त्यांचे बँक तपशील चोरत आहेत.

Netflix सदस्यत्व घोटाळा : तुम्ही देखील Netflix वापरकर्ते असाल, तर तुम्ही ताबडतोब सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. नेटफ्लिक्स वापरकर्त्यांची फसवणूक करण्याचा नवा मार्ग सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. ज्याद्वारे ठग लोकांच्या खात्यातून करोडो रुपये लुटत आहेत. BitDefender च्या सुरक्षा संशोधकांनी दिलेल्या अहवालानं Netflix वापरकर्त्यांना या सायबर घोटाळ्याबद्दल सतर्क केलं आहे. ते म्हणाले की सायबर गुन्हेगार लोकांना बनावट संदेश पाठवून महत्त्वपूर्ण माहिती आणि डेटा चोरत आहेत. नंतर हा डाटा डार्क वेबवर विकला जात आहेत. या घोटाळ्याचा उद्देश नेटफ्लिक्स वापरकर्त्यांचे वैयक्तिक आणि आर्थिक तपशील चोरणं आहे.

Netflixवर कसं लक्ष्य केलं जातं? : हा नवीन घोटाळा प्रथम सायबर सुरक्षा फर्म बिटडेफेंडरच्या ब्लॉग पोस्टद्वारे प्रकाशात आला. जो सप्टेंबरपासून सुरू आहे. जर्मनी, स्पेन, अमेरिका, फ्रान्स, ग्रीस, पोर्तुगाल, ऑस्ट्रेलिया आणि इतर देशांसह एकूण 23 देशांतील लोकांना या घोटाळ्यात लक्ष्य केलं जात आहे.

बक्षीस जिंकल्याचा खोटा संदेश : हा घोटाळा एसएमएसनं सुरू होतो, ज्यामध्ये वापरकर्त्यांना बक्षीस जिंकल्याचा खोटा संदेश पाठवला जातो. या एसएमएससोबत एक लिंकही शेअर केली जाते. ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांचं खातं सुरू ठेवण्यासाठी त्यांची माहिती अपडेट करण्यास सांगितली जाते. वापरकर्ते या लिंकवर क्लिक करताच, त्यांना नेटफ्लिक्सच्या जागी दुसऱ्या बनावट वेबसाइटवर पाठवली जाते. येथे वापरकर्त्यांना लॉग इन करण्यासाठी त्यांचे तपशील शेअर करण्यास सांगितलं जातं.

क्रेडिट कार्ड आणि खात्याची माहिती : लॉग इन केल्यानंतर, त्यांना एक संदेश दाखवला जातो. ज्यात तुमचं खातें बंद केल्याचं सागितलं जातं. तसंच त्यांचे वैयक्तिक आणि आर्थिक तपशील जसं की क्रेडिट कार्ड आणि खात्याची माहिती प्रदान करण्यास सांगितलं जातं. जेणेकरून ते त्यांचे खाते सक्रिय करू शकतील. वापरकर्त्यांची Netflix क्रेडेन्शियल आणि क्रेडिट कार्ड तपशील अनेकदा डार्क वेबवर विकले जातात. त्यामुळं तुम्ही वैयक्तिक आणि आर्थिक तपशील कुठंही शेअर करू नये. तसंच केल्यास तुम्हाला महागात पडू शकतं. म्हणून, वापरकर्त्यांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळलं पाहिजे.

Netflix प्रतिक्रिया : नेटफ्लिक्सनं या घोटाळ्यावर प्रतिक्रिया देत अधिकृत निवेदन जारी केलं आहे. नेटफ्लिक्सनं निवेदनात म्हटलं आहे की, आम्ही तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती ईमेलद्वारे कधीही मागत नाही. आम्ही कधीही कोणत्याही वेबसाइटद्वारे पैसे मागत नाही. तुम्हाला एखादा अनओळखीचा संदेश किंवा ईमेलमध्ये आला असेल तर त्यावर क्लिक करू नका.

हे वाचलंत का :

  1. iQOO 13 उद्या भारतात होणार लॉंच : शक्तिशाली बॅटरी, 2K डिस्प्ले, 50 मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप
  2. Vivo S20 आणि Vivo S20 Pro शक्तिशाली फीचर्ससह लाँच
  3. स्टिकर तयार करणं झालं सोपं : तु्म्हाला व्हॉट्सॲपवप स्टिकर तयार करता येणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.