ETV Bharat / technology

Myntraची 'M-Now' सेवा सुरू, 30 मिनिटांत होणार डिलिव्हरी - MYNTRA M NOW LAUNCH

M Now सेवा सुरू करणारी Myntra कंपनी जगभरात फॅशन वस्तूंची जलद डिलिव्हरी करणारी पहिली कंपनी ठरली आहे.

Myntra
Myntra (Myntra)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 6, 2024, 11:18 AM IST

हैदराबाद : Flipkart च्या मालकीची फॅशन रिटेलर कंपनी Myntra नं M-Now सेवा लॉंच करण्याची घोषणा केलीय. आता ग्राहकांना त्यांची ऑर्डर ३० मिनिटांत मिळेल. फॅशन, ब्युटी ॲक्सेसरीज आणि होम आणि डेकोर श्रेणीतील 10 हजारांहून अधिक उत्पादनांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत ही सेवा 1 लाखांहून अधिक उत्पादनांना जलद ग्राहकांपर्यंत पोहचवण्याचं कंपनीचं उदिष्ट्य आहे. M Now जलद सेवा देणारी Myntra ही जगातील पहिली कंपनी बनली आहे.

मिंत्रा फ्लिपकार्ट समूहाचा एक भाग आहे. ही कंपनी अमेरिकन वॉलमार्टच्या मालकीची आहे. भारतातील फॅशन ई-कॉमर्स बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी कंपनी Amazon Fashion, Reliance Ajio आणि इतर ऑनलाइन फॅशन रिटेलर्सशी स्पर्धा करतेय. भारताचे फॅशन ई-कॉमर्स मार्केट आज 16-17 अब्ज डॉलरवर पोहचलं आहे. 2028 पर्यंत हा व्यावसाय 40-45 अब्ज डॉलरवरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

Myntra च्या सीईओ नंदिता सिन्हा म्हणाल्या, "ब्रँड्सच्या सहकार्यानं, M-Now सेवा फॅशनचा विस्तार करण्यासाठी परिवर्तनकारी भूमिका बजावेल. आम्ही M-Now सोबत पुढं जात असताना, Myntra अनेक विविध उत्पादनावर जलद डिलिव्हरीचा पर्याय दिला आहे.

एम नाऊ सर्व ब्रँडची उत्पादनं ग्राहकांपर्यंत जलद पोहोचवण्यास आता मदत करेल. यामुळं ग्राहकांना त्यांचा आवडता ब्रँड खरेदी केल्यानंतर लगेच डिलिव्हरी मिळेल, असं कंपनीनं म्हटलं आहे. सध्या ही सेवा बेंगळुरूमध्ये लाँच होईल. त्यानंतर येत्या काही महिन्यांत मुंबई, दिल्ली, पुणे आणि इतर शहरांमध्ये या सेवाचा ग्राहक आनंद घेऊ शकता.

याबाबत कंपनीनं सांगितलं की, एम नाऊ प्लॅटफॉर्म ग्राहकांच्या अपेक्षेनुसार काम करतो. कंपनी सध्या दर महिन्याला 7 कोटींहून अधिक सक्रिय ग्राहकांना फॅशन कंटेंट उपलब्ध करून देत आहे. 2022 च्या सुरुवातीला, बेंगळुरूस्थित कंपनीनं महानगरांमध्ये एम-एक्सप्रेस सेवेद्वारे एक्सप्रेस डिलिव्हरी सेवा सुरू केली, ज्याचा उद्देश ग्राहकांना ऑर्डर दिल्यानंतर 24 ते 48 तासांच्या आत माल पोहोचवायचा आहे.

हे वाचंलत का :

  1. iQOO 13 प्री-बुकिंग सुरू, 3 हजारांच्या विशेष सवलतीसह मिळताय मोफत इयरबड्स
  2. 50 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह Moto G35 5G होणार लॉंच
  3. POCO M7 Pro 5G आणि POCO C75 5G लवकरच लाँच होणार, काय असेल खास?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.