हैदराबाद Mukesh Ambani new private jet : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचं नाव तुम्हाला नक्कीच माहिती असेल. यावर्षी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे लग्न बरेच दिवस चर्चेत राहिलं. आता आणखी एक कारणामुळं पन्हा त्यांची चर्चा सरु झालीय. यावेळी चर्चेचं कारण आहे अंबानी कुटुंबाचं नवीन खाजगी जेट बोइंग 737 मॅक्स 9, जे भारतात आलं आहे. हे भारतातील पहिलं अल्ट्रा लक्झरी खाजगी जेट आहे. मुकेश अंबानी यांच्याकडं आधीच अनेक खाजगी जेट आहेत.
New Boeing 737 Max-9 Boeing Business Jet(BBJ) of Mukesh Ambani landed in India.
— RajBhaduriAviator (@RajBhads90) September 4, 2024
As of now the aircraft is registered as T-7 LOTUS in Tax Haven San Marino
Probably would be re-registered in India later pic.twitter.com/N8wUwKq5VC
किती आहे किंमत : या जेटची किंमतीत 200 रोल्स रॉयल कार खरेदी करता येऊ शकतात एव्हढी या विमानाची किंमत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की अंबानी कुटुंबाच्या नवीन लक्झरी प्रायव्हेट जेट बोइंग 737 मॅक्स 9 ची किंमत सुमारे 1000 कोटी रुपये आहे. आतापर्यंत भारतात कोणाकडंही असं विमान नाहीय. भारतात विमानाच्या आगमनाची चर्चा खूप दिवसांपासून होती. विमान भारतात येण्यापूर्वी त्याची बासेल, जिनिव्हा आणि लंडनमध्ये उड्डाण चाचणी करण्यात आली. मुकेश अंबानींचं हे खासगी जेट 2022 मध्येच येणार होतं, परंतु बोइंगशी संबंधित वादामुळं ते भारतात येण्यास विलंब झाला. अंबानी कुटुंबानं त्यांच्या गरजेनुसार त्यात बरेच कस्टमायझेशन केले आहेत.
जगातील एकमेव उद्योगपती : जगातील कोणत्याही उद्योगपतीकडं बोईंग 737 मॅक्स 9 विमान नाहीय. मुकेश अंबानी हे अल्ट्रा लक्झरी प्रायव्हेट जेट खरेदी करणारे जगातील पहिले उद्योगपती आहेत. या विमानात प्रशस्त केबिन असून त्यात मोठ्या स्पेस आहे. या विमानात दोन CFMI LEAP-1B इंजिन आहे. MSN 8401 क्रमांक असलेले हे लक्झरी प्रायव्हेट जेट एकावेळी 11 हजार 770 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकतं. Boeing 737 Max 9 हे आराम, वेग आणि लक्झरी यांचा कॉम्बो मानलं जातं. या जेटला आकाशात 7 स्टार हॉटेल देखील मानतात.
10 खाजगी जेट : अंबानी कुटुंबाकडं 10 खाजगी जेट आहेत. नवीन बोईंग 737 MAX 9 व्यतिरिक्त, आणखी 9 लक्झरी खाजगी जेट आहेत. यामध्ये Bombardier Global 6000 आणि Embraer ERJ-135 तसंच दोन Dassault Falcon 900 यांचा समावेश आहे. 9 लाख कोटींहून अधिक मालमत्तेचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडं अनेक आलिशान कारही आहेत.
यांच्याकडं आहे प्राव्हेट जेट : मुकेश अंबानी व्यतिरिक्त, खाजगी जेट मालकांमध्ये लक्ष्मी मित्तल, पंकज मुंजाल, कलानिधी मारन, नवीन जिंदाल, अदार पूनावाला आणि गौतम अदानी यांसारखे अनेक उद्योगपती आहेत. याशिवाय शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींकडंही खासगी जेट विमान आहे.