ETV Bharat / technology

'या' देशात गुगल स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी - INDONESIA BAN GOOGLE SMARTPHONES

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियानं देशात iPhone 16 वर बंदी घातली होती. आता इंडोनेशिया सरकारनं देशात Google Pixel स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

Google Pixel
Google Pixel (Google)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 1, 2024, 5:34 PM IST

Updated : Nov 1, 2024, 5:48 PM IST

हैदराबाद : Google Pixel phones banned: काही दिवसांपूर्वी iPhone 16 च्या विक्रीवर बंदी घातल्यानंतर इंडोनेशियानं Google Pixel फोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे. इंडोनेशियानं देशांतर्गत तंत्रज्ञान वस्तूची खरेदी न केल्यामुळं Google Pixel स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

iPhone 16 च्या विक्रीवर बंदी : इंडोनेशिया सरकारच्या नियमांनुसार, तंत्रज्ञान कंपन्यांनी हँडसेट आणि टॅब्लेटचे 40% घटक देशांतर्गत घेतले पाहिजेत. या गरजा स्थानिक उत्पादन, फर्मवेअर विकास किंवा नाविन्यपूर्ण प्रकल्पांमध्ये थेट गुंतवणूकीद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात, असं इंडोनेशिया सरकारचं म्हणणे आहे. इंडोनेशियाने का घातली बंदी, जाणून घ्या सविस्तर...

Google स्मार्टफोन विकता येणार नाही : इंडोनेशियाच्या उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे की इंडोनेशियामध्ये विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनमध्ये 40% स्थानिक वस्तूची आवश्यकता पूर्ण केल्याशिवाय Google स्मार्टफोन विकले जाऊ शकत नाहीत. उद्योग मंत्रालयाचे प्रवक्ते फेब्री हेन्ड्री अँटनी ॲरिफ म्हणाले की, Google नं विक्री पुन्हा सुरू करण्यापूर्वी स्थानिक वस्तूचं प्रमाणपत्र प्राप्त करणं आवश्यक आहे.

या कारणामुळं घातली बंदी : Arief च्या मते, "स्थानिक वस्तू नियम आणि संबंधित धोरणे सर्व गुंतवणूकदारांसाठी निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी आणि इंडोनेशियामधील उद्योग संरचना मजबूत करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत." ॲपलनं 95 दशलक्ष डॉलर गुंतवणुकीचं वचन पूर्ण न केल्यामुळं त्यांच्या फोनवर देशात बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर आज गुगलच्या स्मार्टफोवर बंदी घालण्यात आली आहे.

देशांतर्गत वस्तू वापरा : इंडोनेशियन नियमांनुसार, तंत्रज्ञान कंपन्यांनी 40% हँडसेट आणि टॅबलेट घटक देशांतर्गत वापरले पाहिजेत. या गरजा स्थानिक उत्पादन, फर्मवेअर डेव्हलपमेंट किंवा इनोव्हेशन प्रोजेक्ट्समध्ये थेट गुंतवणुकीद्वारे पूर्ण केल्या जाऊ शकतात. वेगवेगळ्या कंपन्या या गरजा वेगवेगळ्या प्रकारे पूर्ण करत आहेत, असं त्यांचं म्हणणे आहे.

हे वचालंत का :

  1. इराणनं आयफोनवरील बंदी उठवली, iPhone खरेदीचा मार्ग मोकळा
  2. ॲपल भारतात 4 नवीन स्टोअर्स उघडणार, भारतात केला कमाईचा विक्रम
  3. Honor Magic 7 आणि Honor Magic 7 Pro लॉंच, 200MP टेलिफोटो कॅमेरा

Last Updated : Nov 1, 2024, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.