ETV Bharat / technology

नोव्हेंबर 2024 मध्ये स्मार्टफोन निर्यातीत विक्रमी वाढ, एका महिन्यात 20 कोटींचा आकडा ओलांडला - SMARTPHONE EXPORTS INCREASE

या वर्षी नोव्हेंबरमध्ये भारतानं स्मार्टफोन निर्यातीत विक्रम नोंदवलाय. भारतानं एका महिन्यात पहिल्यांदाच 20 हजार कोटींच्या निर्यातीचां टप्पा ओलांडला आहे. यात सर्वाधिक निर्यात ॲपलनं केलीय.

representative photo
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

हैदराबाद : भारतात स्मार्टफोन निर्यातीत या वर्षी नोव्हेंबरमध्ये वाढ (India smartphone exports increase) झाली आहे. पहिल्यांदाच एका महिन्यात 20 कोटी रुपयांचा आकडा भारतानं ओलांडला आहे. स्मार्टफोन निर्यातीत सर्वाधिक वाढ ॲपलनं केलीय. आकडेवारीनुसार, स्मार्टफोन निर्यात 20,300 कोटी रुपयांच्या पुढं गेली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 90 टक्क्यांहून अधिक आहे.

स्मार्टफोन निर्यातीत ॲपलची आघाडी : गेल्या महिन्यात निर्यातीत ॲपलनं आघाडी (Apple smartphone exports) घेतलीय. त्यानंतर सॅमसंगनं देखील चागंली कामगिरी केलीय. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये देशातून स्मार्टफोन निर्यात 10,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. 2024 पर्यंत देशातील स्मार्टफोन बाजारपेठेत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, सरकारच्या उत्पादन-लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेमुळं, आर्थिक वर्ष 25 च्या सात महिन्यांत (एप्रिल-ऑक्टोबर) देशातील ॲपल आयफोनचं उत्पादन 10 अब्ज डॉलर्सवर पोहोचलं आहे. ज्यामध्ये केवळ 7 अब्ज डॉलर्सची निर्यात झालीय.

स्मार्टफोन बाजारपेठेत 7-8 टक्क्यांनी वाढ : आर्थिक वर्ष 24 मध्ये, भारतात 14 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे आयफोन निर्यात केले गेले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर पोस्ट केलीय. 'ॲपलनं 10 अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन निर्यात केले आहेत. 7 महिन्यांत भारतातून एकूण स्मार्टफोन निर्यात 10.6 अब्ज डॉलर्स ओलांडली आहे. प्रीमियम, 5जी आणि एआय स्मार्टफोन्सच्या जोरदार मागणीमुळं या वर्षी भारताच्या स्मार्टफोन बाजारपेठेत 7-8 टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

तज्ज्ञांच्या मते, आर्थिक वर्ष 2030 पर्यंत स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात 500 अब्ज डॉलर्सचं लक्ष्य साध्य करण्यासाठी, उद्योगांनी निर्यात वाढीला प्राधान्य दिलं पाहिजे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) च्या आकडेवारीनुसार, 2014-15 मध्ये मोबाईल फोनचं उत्पादन 18,900 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2024 मध्ये अंदाजे 4.10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढलंय. PLI योजनेमुळं यात 2000 टक्क्यानं मोठी वाढ झालीय.

'हे' वाचलंत का :

  1. Lava Blaze Duo 5G भारतात लॉंच, जाणून घ्या एका क्लिकवर सर्व माहिती
  2. Moto G35 5G चा पहिला सेल आज, 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत घरबसल्या करा ऑर्डर
  3. Apple iPhone 17 पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच होण्याची शक्यता, काय असतील बदल?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.