हैदराबाद : दरवर्षीप्रमाणे नवीन वर्षात वाहन उत्पादक त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवतात. यावेळी देखील, कार उत्पादक कंपन्या 1 जानेवारी 2025 पासून त्यांच्या पोर्टफोलिओच्या किमती वाढवणार आहेत. किमतीत ही वाढ कमोडिटी आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळं झाली आहे.
ह्युंदाई मोटर इंडिया : कोरियन कार उत्पादक कंपनी Hyundai नं भारतातील आपल्या सर्व कारच्या किमती 25,000 रुपयांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. कोरियन ब्रँड भारतीय बाजारपेठेत Hyundai Venue, Creta आणि Exter सारख्या हॅचबॅकसह Hyundai Aura sedan, Grand i10 Nios आणि i20 सारख्या SUV देखील विकतो. याशिवाय, कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Ioniq 5 EV देखील आहे.
निसान इंडिया : जपानी कार निर्माता कंपनी Nissan नं नुकतीच भारतीय बाजारात सर्वात लोकप्रिय Nissan Magnite चं फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केलं आहे. आता कंपनी तिची किंमत 2 टक्क्यांनी वाढवणार आहे. मॅग्नाइट ही कंपनीची एकमेव मेड-इन-इंडिया SUV आहे, जी देशांतर्गत विकली जाते. परदेशातही अनेक देशांमध्ये या कारची निर्यात केली जाते.
ऑडी इंडिया : लक्झरी कार उत्पादक ऑडी इंडिया देखील 1 जानेवारी 2025 पासून आपल्या कार आणि SUV च्या किमती 3 टक्क्यांनी वाढवणार आहे. कंपनी ऑडी A4 आणि A6 सेडान तसेच ऑडी Q3, Q3 स्पोर्टबॅक, Q5 आणि Q7 SUV ची भारतात स्थानिकरीत्या असेंबल रेंजमध्ये विक्री करत आहे. याशिवाय, कंपनी A5 स्पोर्टबॅक, Q8 SUV सारख्या आयात केलेल्या कार आणि त्याचे इलेक्ट्रिक डेरिव्हेटिव्ह आणि e-Tron GT आणि RS e-Tron GT विकत आहे.
बीएमडब्ल्यू इंडिया : या यादीत बीएमडब्ल्यू इंडियाचंही नाव आहे, जी नवीन वर्षापासून आपल्या कारच्या किमती ३ टक्क्यांनी वाढवणार आहे. कंपनी भारतात स्थानिक पातळीवर BMW 2 सीरीज ग्रॅन कूप, 3 सीरीज ग्रॅन लिमोझिन आणि M340i, 5 सीरीज LWB, 7 सीरीज, X1, X3, X5 आणि X7 SUV चे एकत्रीकरण आणि विक्री करत आहे. याशिवाय, BMW i4, i5 आणि i7 इलेक्ट्रिक कार, iX1 आणि iX इलेक्ट्रिक SUV, Z4, M2 Coupe, M4 Competition आणि CS, M8, XM आणि नुकत्याच लाँच झालेली BMW M5 आयात केली जातेय.
मर्सिडीज बेंझ इंडिया : या वर्षाच्या अखेरीस किंमत वाढीची घोषणा करणारी मर्सिडीज ही पहिली कार निर्माता कंपनी होती. कंपनी आपल्या मॉडेल्सच्या किमती ३ टक्क्यांनी वाढवणार आहे. कंपनीनं पुष्टी केली आहे की GLC च्या किंमती 2 लाख रुपयांनी वाढवल्या जातील, तर Mercedes-Maybach S680 V12 ची किंमत 9 लाख रुपयांनी जास्त असेल. याव्यतिरिक्त, या तारखेपूर्वी बुक केलेल्या युनिट्ससह 31 डिसेंबर 2024 पर्यंत उत्पादित मॉडेल्सच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ होणार नाही.
हे वाचलंत का :