ETV Bharat / technology

पेट्रोलचं झंझट गायब, Activa EV 27 नोव्हेंबर होणार लाँच, बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 70 किमी पर्यंतची रेंज

Honda Activa EV : Honda कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Activa EV27 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. जाणून घ्या फीचर...

Honda Activa EV
इलेक्ट्रिक स्कूटर Activa EV (Honda)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : 2 hours ago

हैदराबाद : Honda Motorcycle 27 नोव्हेंबर रोजी आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Activa EV लाँच करणार आहे. कंपनीनं या स्कूटरचा टीझर आधीच जारी केला आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची रचना आणि अनेक वैशिष्ट्ये कंपनीच्या CUV e इलेक्ट्रिक स्कूटरसारखी असण्याची शक्यता आहे. Honda नं यापूर्वी 2023 च्या टोकियो मोटर शोमध्ये CUV e चं सादरीकरण केलं होतं.

डिझाइन आणि वैशिष्ट्ये : Honda नं Activa Electric च्या टीझरमध्ये दुचाकीच्या डिझाईनची झलक दिसलीय. स्कूटरच्या हेडलाइट, सीट आणि इलेक्ट्रिक मोटरची रचना CUV e सारखी दिसतेय. CUV e मध्ये आधुनिक डिझाइनसह पारंपारिक स्कूटरची झलक आहे. यात स्मूथ फिनिश, स्लीक टेल लॅम्प बार आणि ऍप्रॉन-माउंटेड हेडलॅम्प यांसारख्या घटकांचा समावेश आहे.

तीन रंग पर्याय : ही स्कूटर तीन रंगांच्या पर्यायांमध्ये लॉंच होण्याची शक्यता आहे. यात पर्ल जुबिली व्हाइट, मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलिक आणि प्रीमियम सिल्व्हर मेटॅलिक रंगाचा समावेश आहे.

डिस्प्ले आणि कनेक्टिव्हिटी : या स्कूटरमध्ये तुम्हाला ड्युअल TFT डिस्प्लेचा पर्याय मिळणार आहे. ज्यामध्ये 5-इंच आणि 7-इंच स्क्रीनचा समावेश असू शकतो. मोठी स्क्रीन Honda RoadSync Duo द्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करेल. ही प्रणाली कॉल, संगीत नियंत्रण आणि नेव्हिगेशनसाठी ब्लूटूथ पेअरिंगला परवानगी देते. इतर वैशिष्ट्यांमध्ये USB-C चार्जिंग पोर्ट आणि दोन्ही बाजूंना 12-इंच अलॉय व्हील समाविष्ट आहेत.

Activa CUV e ची वैशिष्ट्ये : CUV e चे वैशिष्ट्य पाहता, Activa Electric मध्ये काही समान वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता आहे. स्कूटरची आसन उंची 765 मिमी मारण्याची शक्यता आहे. तसंच व्हीलबेस 1,311 मिमी असेल. यात तुम्हाल ग्राउंड क्लीयरन्स 270 मिमी मिळेल. या स्कूटरचं वजन 118 किलो आहे. यात तुम्हाला तीन राइडिंग मोड मिळतील. यात स्टँडर्ड, स्पोर्ट इको असे तीन मोड मिळतील.

बॅटरी कामगिरी : CUV e मध्ये 1.3 kWh बॅटरी पॅक मिळेल, जो 6 kW पर्यंत कमाल पॉवर निर्माण करते. त्याची टॉप स्पीड 80 किमी/ प्रिती तास आहे. बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 70 किमी पर्यंतची रेंज देईल. 0 ते 75% पर्यंत बॅटरी चार्ज होण्यासाठी सुमारे 3 तास लागेल. ॲक्टिव्हा ईव्हीमध्येही एमआरएफ टायर वापरण्यात येणार असून शहरी वाहतूक लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. लॉंच झाल्यानंतर, ही स्कूटर इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये होंडासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत का :

  1. Huawei Mate 70 सीरीज 26 नोव्हेंबर होणार लॉंच, Kirin 9100 चिप आणि प्रगत बॅटरी
  2. गुगल मॅपचे 'हे' फीचर्स तुम्हाला माहीत आहेत का?
  3. दोन वर्षात 'या' एसयूव्हीनं केली रेकॉर्डतोड विक्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.