ETV Bharat / technology

Google Maps मध्ये "जेमिनी"AI फिचर, काय आहे खास? - GOOGLE MAPS NEW AI FEATURES

Google Maps AI features : Google Maps "जेमिनी"AI वैशिष्ट्ये जोडण्यात आलं आहे. त्यामुळं नागरिकांना विविध माहिती मिळणार आहे.

Google Maps Adds AI Features
Google Maps AI वैशिष्ट्ये (AP)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 2, 2024, 12:21 PM IST

हैदराबाद Google Maps AI features : रोज करोडो लोक Google मॅपचा वापर करतात. त्यामुळं गुगलनं मॅपमध्ये नवीन AI वैशिष्ट्य आणलं आहे. या वैशिष्ट्यामुळं नेव्हिगेशन, प्लॅनिंग आणि एक्स्प्लोरेशन पूर्वीपेक्षा सोपं होणार आहे. वापरकर्त्यांना नवीन ठिकाणे शोधण्यात, अचूक मार्गदर्शक करण्यासाठी Google आता "जेमिनी" AI मॉडेलचा वापर करणार आहे. चला जाणून घेऊया Google Maps मध्ये कोणते खास बदल आले आहेत…

"जेमिनी"AI ची नवीन वैशिष्ट्ये : गुगल मॅप्स तुमच्या आवडीनुसार खास सूचना देणार आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही रात्री मित्रांसोबत बाहेर जाण्याचा विचार करत असाल, AI तुम्हाला जवळपासच्या लाइव्ह म्युझिक ठिकाणं किंवा कॅफेची माहिती देणार आहे. याद्वारे तुम्ही विशिष्ट प्रश्न देखील विचारू शकता, जसे की "बाहेर बसायला जागा आहे का?" किंवा "तेथे वातावरण आरामदायक आहे का?". याचा अर्थ असा की आता तुम्हाला रात्रीच्या वेळी चांगल्या कॅफे किंवा ठिकाणासाठी भटकावं लागणार नाही. हे वैशिष्ट्य सध्या यूएसमध्ये Android आणि iOS वर उपलब्ध आहे. लवकरच Google सर्चमध्ये त्या जोडण्यात येणार आहे.

उत्तम ड्रायव्हिंग अनुभव : ड्रायव्हिंगसाठी गुगल मॅपमध्ये काही नवीन टूल्स जोडण्यात आली आहेत. आता तुम्ही तुमच्या मार्गावर थांबे जोडू शकता. वाटेत खास ठिकाणं, रेस्टॉरंट्स किंवा विशेष ठिकाणं पाहू शकता. यामुळं प्रवास अधिक मनोरंजक आणि सुलभ होतो. नकाशांमध्ये आता लेन मार्गदर्शन देखील मिळणार आहे, जे तुम्हाला कोणत्या लेनमध्ये गाडी चालवायची ते सांगणार आहे. याशिवाय, तुम्ही आता मॅपवर हवामानाशी संबंधित माहिती देखील पाहू शकता, जसे की पूर किंवा बर्फाच्छादित रस्त्यांची माहिती, जी तुम्हाला मदत करु शकते.

इमर्सिव्ह व्ह्यू : Google Maps चे "इमर्सिव्ह व्ह्यू" आता 150 शहरांमध्ये आणलं गेलं आहे. हे वैशिष्ट्य तुम्हाला कोणत्याही ठिकाणाचे 3D दृश्य दाखवणार आहे. तेथील हवामान आणि रहदारीची स्थिती देखील यात पाहता येईल. प्रवास करण्यापूर्वी तुम्ही स्टेडियम, उद्यानं किंवा महाविद्यालये यासारखी ठिकाणे तपशीलवार पाहू शकता. या नवीन अद्यतनांसह, Google मॅप तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

हे वाचलंत का :

  1. काय आहे स्नॅपड्रॅगन प्रोसेसर?, स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसर का वापरतात?
  2. WhatsApp आणलं नवं फिचर, पसंतीनुसार करता येणार चॅट लिस्ट
  3. 'या' देशात गुगल स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.