ETV Bharat / technology

प्लास्टिकवर रासायनिक प्रक्रिया करून मिळतंय इंधन - Chemical plastics recycling - CHEMICAL PLASTICS RECYCLING

Chemical plastics recycling : प्लास्टिक कचऱ्यावर प्रयोग करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. एका संशोधनात प्लास्टिकवर रासायनिक प्रक्रिया करून नवीन पॉलिमर तसंच पेट्रोकेमिकल इंधन मिळवण्याची प्रक्रिया शास्त्रज्ञांनी शोधून काढलीय.

Chemical plastics recycling
प्लास्टिक कचरा (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 30, 2024, 10:27 AM IST

Updated : Aug 30, 2024, 11:21 AM IST

झुरिच Chemical plastics recycling : जगभरात दरवर्षी लाखो टन प्लास्टिक कचरा निर्माण होतो. या कचऱ्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यासाठी शास्त्रज्ञ नवीन पद्धतींचा अभ्यास करत आहेत. प्लास्टिक कचऱ्याच्या सध्याच्या पुनर्वापराच्या पद्धती खूप कमी आहेत. बहुतेक प्लास्टिक कचऱ्याचा यांत्रिक पद्धतीनं पुनर्वापर केला जातो. हा कचरा बारीक करून नंतर वितळवला जातो. या प्रक्रियेतून नवीन प्लास्टिक उत्पादनं तयार होत असली, तरी प्रत्येक पुनर्वापरासाठी त्यांची गुणवत्ता खालावत जाते.

प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर : प्लास्टिक कचऱ्यावर रासायनिक प्रयोग करून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. कारण नंतर तयार होणाऱ्या वस्तूची गुणवत्ता देखील चांगली राहते. या पद्धतीमध्ये प्लास्टिकचे रेणू (पॉलिमर) नवीन, उच्च-गुणवत्तेच्या प्लास्टिकमध्ये पुन्हा एकत्र केलं जाऊ शकतात. ज्यामुळं एक टिकाऊ वस्तू तयार होते. तसंच त्यापासून आपण इंधन बनवू शकतो.

कचऱ्यापासून मिळणार इंधन : रासायनिक पुनर्वापराचा दृष्टीकोन विकसित होत असताना, या लांब पॉलिमर (प्लास्टिकचे रेणू ) वेगवेगळे करण्यावर प्रारंभिक लक्ष केंद्रित केलं जातं. जे द्रव इंधन किंवा वंगण म्हणून वापरले जाऊ शकतं. यामुळं प्लास्टिकच्या कचऱ्याला पेट्रोल, जेट इंधन किंवा इंजिन ऑइल म्हणून दुसरी संजीवनी मिळते. ETH झुरिच येथील शास्त्रज्ञांनी आता ही प्रक्रिया विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण काम करतायत.

प्लास्टिकवर रासायनिक प्रक्रिया : कॅटालिसिस इंजिनीअरिंगचे प्राध्यापक जेवियर पेरेझ-रामीरेझ यांच्या नेतृत्वाखालील गटातील संशोधकांनी हायड्रोजनसह, पॉलीथिलीन आणि पॉलीप्रॉपिलीनला कसं वेगळं करायचं, याचा शोध घेतलाय. इथेही, पहिल्या पायरीत स्टीलच्या टाकीत प्लास्टिक वितळवावं लागतं. नंतर वितळलेल्या प्लास्टिकमध्ये वायूयुक्त हायड्रोजन मिसळतं. यात नंतर रुथेनियम सारखे धातू असलेले चूर्ण समाविष्ट केलं जातं. योग्य रासायनिक प्रक्रिया वापरून संशोधक अभिक्रियाची कार्यक्षमता वाढवू शकतात.

अशी करतात प्रक्रिया : “वितळलेलं प्लास्टिक मधापेक्षा हजारपट जाड असतं. उत्प्रेरक पावडर आणि हायड्रोजन बरोबर मिसळण्यासाठी तुम्ही ते टाकीमध्ये कसं ढवळता ते महत्त्वाचे आहे,” पेरेझ-रामीरेझच्या गटातील शास्त्रज्ञ अँटोनियो जोस मार्टिन स्पष्ट करतात. प्रयोग आणि संगणक सिम्युलेशनद्वारे, संशोधनकांनी दाखवून दिलं, की इंपेलर वापरून प्लास्टिक सर्वोत्तम प्रकारे ढवळलं जातं. कोन ब्लेड किंवा टर्बाइन-आकाराच्या स्टिररसह प्रोपेलरच्या तुलनेत, याचा परिणाम अधिक समान मिश्रण करण्यासाठी होतो. ढवळण्याचा वेगही तितकाच महत्त्वाचा आहे. ते खूप मंद किंवा खूप वेगवान नसावं, संशोधकांनी संपूर्ण रासायनिक पुनर्वापर प्रक्रियेचे सर्व पॅरामीटर्ससह वर्णन करण्यासाठी एक गणितीय सूत्र विकसित केलंय. पेरेझ-रामीरेझ म्हणतात, “प्रत्येक रासायनिक संशोधकाचं स्वप्न असतं, की त्यांच्या प्रक्रियेसाठी, असं एक सूत्र हातात असावं. संशोधन क्षेत्रातील सर्व शास्त्रज्ञ आता स्टिररच्या भूमिती आणि गतीच्या परिणामाची अचूक गणना करू शकतात. या सूत्रासह, येथे विकसित केलेली तत्त्वे प्रयोगशाळेपासून मोठ्या रीसायकलिंग प्लांटपर्यंत तंत्रज्ञान वाढवण्यासाठी मदत करू शकता. “परंतु सध्या आमचं लक्ष प्लास्टिकच्या रासायनिक पुनर्वापरासाठी उत्तम उत्प्रेरकांवर संशोधन करण्यावर आहे,”असं मार्टिन म्हणतात.

हे वाचलंत का :

अणुचाचणी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस : 29 ऑगस्टचं काय आहे महत्त्व? - Day Against Nuclear Tests

Last Updated : Aug 30, 2024, 11:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.