ETV Bharat / technology

'ही' मिरची खाल्यास निघणार 'भूत', काय आहे भूत मिरचीचं रहस्य? - Bhoot Jolokia

Bhoot Jolokia : भारतीय लोकांना मसालेदार पदार्थ आवडतात. त्यासाठी आपण विविध तिखट मिरच्याचा वापर करतो. मात्र, जगातील सर्वात तिखट मिरची कोणीती? हे तुम्हाला माहितीय का?, या मिरचीला 'भूत जोलोकिया' मिरची का म्हणात?, तर चला जाणून घेऊया एका भूत मिरचीची माहिती.

Bhoot Jolokia
भूत जोलोकिया (Getty Image)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 21, 2024, 11:24 AM IST

Updated : Sep 21, 2024, 4:44 PM IST

हैदराबाद Bhoot Jolokia : ईशान्य भारतातील आसाम, नागालँड तसंच मणिपूरमध्ये जगातील सर्वात तिखट मिरचीची लागवड केली जाते. तिच्या गुणधर्मामुळं तिला भूत जोलोकिया म्हणून ओळखलं जातं. भूत जोलोकियाचं पाककृतींत महत्वाचं स्थान आहे. या प्रदेशात या मिरचीला सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व देखील आहे.

भूत जोलोकिया : भूत जोलोकियाला (आसामी भाषेत "घोस्ट चिली" असं भाषांतर होतं) हे नाव या ज्वलंत मिरचीच्या अलौकिक गुणामुळं मिळतं. भूत जोलोकियालाचं स्कोव्हिल हीट रेटिंग 1 दशलक्ष स्कोव्हिल हीट युनिट्स (SHU) पेक्षा जास्त आहे. म्हणूनच तिचा समावेश जगातील सर्वात उष्ण मिरचीत होतो. सरासरी मिरचीची उष्णता पातळी सुमारे 2,500 ते 8,000 SHU असते. भूत जोलोकिया कॅप्सिकम चिनीन्स प्रजातीमधील एक प्लॅंट आहे. भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये शतकानुशतकं या मिरचीची लागवड केली जातेय. ही मिर्ची आसामी, नागा आणि मणिपुरी पाककृतींमध्ये एक मुख्य पदार्थ म्हणून वापरली जाते. या मिरचीपासून करी, चटण्या, सॉस बनवला जातो. तिच्या तीव्र तिकटपणामुळं ती स्थानिक पदार्थांमध्ये एक मौल्यवान घटक बनवते.

Bhoot Jolokia
भूत जोलोकिया (Getty Image)

कशामुळं येतो टिखटपणा : भुत जोलोकिया मिरचीच्या तिखटपणासाठी कॅप्सेसिन हे प्रमुख रसायन जबाबदार आहे. कॅप्सेसिन अद्वितीय गुणधर्मांमुळे भुत जोलकिया मिरची सर्वात तिखट बनते. या व्यतिरिक्त डायहाइड्रोकॅप्सायसिन (DHC), नॉर्डीहाइड्रोकॅप्सायसिन (NDHC), होमोडायहायड्रोकॅप्सायसिन (HDHC) या ही संयुगे देखील तिच्या तिखटपणाला जबाबदार आहेत.

"A, B2, B6, C, E, भुत जलोकियाची जीवनसत्त्वे असून नियासिन, फोलेट आणि रिबोफ्लेविनचा समृद्ध स्रोत आहे. त्यात जस्त, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम,सल्फर सारखी खनिजे देखील असतात. कॅप्सिकम रसायनात फायटोकेमिकल्स, अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. लाल मिरचीचा Capsaicin घटक एकूण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स, लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन्स (LDL) कमी करण्यास मदत करू शकतो". - किशोर पाईकराव, सहाय्यक प्राध्यापक, (वनस्पतिशास्त्र) चिंतामणी कला, विज्ञान महाविद्यालय गोंडपिपरी (चंद्रपूर)

Bhoot Jolokia
भूत जोलोकिया (Getty Image)

मिरचीची जागतिक ओळख : 2007 मध्ये पहिल्यांदा भूत जोलोकिया मिरचीनं आंतरराष्ट्रीय जगताचं लक्ष आपल्याकडं वेधून घेतलं होतं. कारण गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये तिला जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून स्थान देण्यात आलं होतं. तिच्या वैशिष्ट्यामुळंच भूत जोलोकियाला जागतिक ओळख मिळाली होती. पाश्चात्य देशांमध्ये या मिरचीला गरम सॉस, मिरची पावडर, मसालेदार पदार्थासाठी मागणी आहे. भूत जोलोकिया आसाम, नागालँड आणि मणिपूरच्या स्थानिक समुदायांसाठी, जागतिक ओळख बनलीय. ही मिरची स्थानिक शेतकऱ्याच्या शेतात पिकविली जाते. पिढ्यान्पिढ्या या मिरचीचा स्वयंपाकामध्ये वापर होतो. ही मिरची नागालँडमध्ये "आदिवासी पाककृती"चा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

Bhoot Jolokia
भूत जोलोकिया (Getty Image)

शेतीचं महत्त्व आणि आर्थिक संधी : ईशान्येकडील स्थानिक शेतकऱ्यांसाठी, भूत जोलोकियाच्या उदयाने नवीन आर्थिक संधी उपलब्ध झाल्या आहेत. या मिरचीला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी असल्यानं तिची लागवड वाढली आहे. मात्र, घोस्ट मिरचीला विशिष्ट हवामानाची आवश्यकता असते. उच्च आर्द्रता, भरपूर पाऊस, आणि चांगली पाणी निचरा होणारी माती अशा ठीकाणी या मिरचीची लागवड करता येते.

Bhoot Jolokia
भूत जोलोकिया (Getty Image)

भूत जोलोकियासाठी प्रोत्साहन : मिरचीच्या लोकप्रियतेत वाढ झाल्यामुळं, भारत सरकारनं भूत जोलोकिया लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पावलं उचलली आहेत. कृषी उपक्रमांमुळं उत्पादन प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात, उत्पादन सुधारण्यात आणि सेंद्रिय शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यास सरकाचं काम सुरू आहे. सॉस, सुकी मिरची आणि पावडर यांसारख्या उत्पादनांच्या निर्यातीत अलीकडच्या काही वर्षांत सातत्यानं वाढ झाली आहे. ज्यामुळं ग्रामीण समुदायांच्या आर्थिक उन्नतीला हातभार लागला आहे.

Bhoot Jolokia
भूत जोलोकिया (Getty Image)

भूत जोलोकियाचा उपयोग : भूत जोलोकियाची ज्वलंत उष्णता अनेकांना जबरदस्त वाटत असली तरी, त्याचा उपयोग स्वयंपाकघराच्या व्यतिरिक्तही होतो. ईशान्य भारतात या मिरचीचा उपयोग औषधी कारणांसाठी केला जातो. या मिरचीमुळं पाचन समस्या, वेदना, उष्माघातापासून बचाव करण्यात मदत होते, असा स्थानिक समुदायाचा दावा आहे. शिवाय, मिरचीमध्ये प्रतिजैविक आणि दाहक-विरोधी गुणधर्म असल्याचं मानलं जातं. पारंपारिक औषधांमध्ये, कधीकधी सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी किंवा संक्रमणाशी लढण्यासाठी या मिरचीचा वापर केला जातो.

भूत जोलोकिया-मिरचीचा ग्रेनेडमध्ये वापर : विशेष म्हणजे भारतीय लष्करालानही या शक्तिशाली मिरचीचा चांगला उपयोग केलाय. 2010 मध्ये, भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) नं भूत जोलोकिया-मिरचीचा ग्रेनेडमध्ये वापर केला होता. हे ग्रेनेड विरोधकांना विचलित करण्यासाठी केला गेला. या ग्रेनेडला हवेत उत्सर्जित करून जमाव पांगवण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. ज्यामुळं कायमची जीवितहीन न होता शत्रूला जीवंत पकडता येत होतं.

भूत जोलोकिया समोरील आव्हान : प्रसिद्धी आणि मागणी असूनही, भूत जोलोकियाचं व्यापारीकरण करणं एक मोठं आव्हान आहे. मर्यादित पायाभूत सुविधांसह शेतातील दुर्गम स्थानामुळं मिरची मोठ्या बाजारपेठेत नेणं कठीण आहे. ताज्या मिरचीच्या मागणीतील चढउतार आणि नाशवंत स्वरूपाशी संबंधित समस्यांना देखील शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं. मिरचीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी वेळेवर कापणी तसंच तिच्यावर प्रक्रिया करणं आवश्यक आहे.

भूत जोलोकियाचं भविष्य : मसालेदार पदार्थांची मागणी जागतिक स्तरावर वाढत असल्यानं भूत जोलोकियाचं भविष्य आशादायक दिसत आहे. ईशान्येकडील शेतकरी मिरचीचं उत्पादन वाढवण्याचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधत आहेत. तसंच खाद्य उद्योजक मिरचीचा मुख्य प्रवाहात समावेश करण्यासाठी सतत नवनवीन प्रयोग करत आहेत. पाककलेच्या पलीकडं भूत जोलोकियाचं सांस्कृतिक महत्त्व, तिचे अष्टपैलु गुण लोकांना मोहित करत आहे. आसामच्या ग्रामीण शेतापासून ते जागतिक स्वयंपाकघरापर्यंत, घोस्ट मिरचीची चव जागतीक स्तरावर पोहचीलय.

Last Updated : Sep 21, 2024, 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.