हैदराबाद Automatic Cars vs Manual Cars : भारतातील कार बाजार वेगानं वाढत आहे. त्यामुळे कार खरेदी करणारे ग्राहक आता ऑटोमॅटिक ट्रान्समिशनकडे वळत आहेत. परंतु, काही अहवालांनुसार, ऑटोमॅटिक कार निवडणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा मॅन्युअल कार निवडणारे लोक अजूनही जास्त आहेत. भारतीय ग्राहक मॅन्युअल कारला प्राधान्य देण्याची कारणं काय आहेत, ते जाणून घेऊया.
1. भारतीय स्वयंचलित कारऐवजी मॅन्युअल कार का निवडत आहेत : भारतात कोविड-19 साथीच्या आजारानंतर, बरेच ग्राहक ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कार निवडत आहेत. याचं कारण म्हणजे गाडी चालवणं सोपं आहे. यात गिअर बदलण्याची आणि क्लच पुन्हा पुन्हा दाबण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन वाहनांना चांगली मागणी असूनही, काही अहवालानुसार भारतातील बहुतेक लोकांना मॅन्युअल ट्रान्समिशन कार खरेदी करण्यात रस आहे.
2. किमतीत मोठा फरक : मॅन्युअल कार आवडण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांच्यातील किंमतीतील फरक आहे. एकाच कारच्या ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल व्हेरियंटमधील फरक 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. मॅन्युअल कार त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळं भारतीय ग्राहक पैसे वाचवण्यासाठी मॅन्युअल कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
3. विम्याची किंमतदेखील जास्त : स्वयंचलित कारची किंमत केवळ जास्त नाही, तर विमा कंपन्या जास्त विमा हप्ता घेतात. वाहन अधिक महाग असल्यानं त्याचा विमा खर्चही जास्त आहे. अशा परिस्थितीत, अनेक ग्राहक विमा खर्च कमी करण्यासाठी मॅन्युअल कार खरेदी करण्यास प्राधान्य देतात.
4. देखभाल खर्चात वाढ : स्वयंचलित कारच्या गिअरबॉक्सची रचना मॅन्युअल कारच्या तुलनेत अधिक जटिल आहे. त्यामुळं त्याची देखभालही अधिक करावी लागते. दुसरीकडे, मॅन्युअल कारचा देखभाल खर्च कमी असतो. त्यामुळे भारतीय ग्राहक मॅन्युअल कार खरेदीला प्राधान्य देतात.
5. विश्वासार्हता : मॅन्युअल कारच्या गिअरबॉक्सेसपेक्षा स्वयंचलित गिअरबॉक्स कमी टिकणारे असतात. भारतातील अधिक लोक मॅन्युअल कार खरेदी करण्यास प्राधान्य देण्याचं हे आणखी एक मोठं कारण असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच, मॅन्युअल गिअरबॉक्स तांत्रिकदृष्ट्या प्रगत आहे. हे AMT प्रकारांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे.
6. दुरुस्ती सहजासहजी केली जात नाही : स्वयंचलित गिअरबॉक्सची रचना मॅन्युअल गिअरबॉक्सपेक्षा अधिक जटिल आहे. त्यामुळं काही दोष असल्यास ते दुरुस्त करणं कठीण आहे. कारण प्रत्येक मेकॅनिक स्वयंचलित कार दुरुस्त करण्यास सक्षम नसतो. अशा परिस्थितीत योग्य मेकॅनिक शोधणं खूप कठीण आहे. तर मॅन्युअल गिअरबॉक्ससाठी मेकॅनिक शोधणं सोपं आहे.
7. ओव्हरहाटिंग आणि जर्की राईड : ट्रॅफिकमध्ये ऑटोमॅटिक कार अधिक चांगल्या असतात. परंतु ट्रॅफिकमध्ये बराच वेळ चालवल्यावर त्यांचा गिअरबॉक्स जास्त गरम होतो. तर मॅन्युअल गिअरबॉक्स सिस्टीममध्ये या समस्या येत नाहीत.
- भारतीय लोक मॅन्युअल कार निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे ड्रायव्हिंगचा अनुभव वेगळा असतो. अनेक कार मालकांच्या मते, मॅन्युअल गिअरमुळं तुम्हाला कारचं अधिक नियंत्रण मिळते. भारतीय ऑटोमॅटिक कार्सऐवजी मॅन्युअल कारला प्राधान्य देण्याची ही मुख्य कारणे आहेत.
हेही वाचा :