ETV Bharat / state

झटपट श्रीमंत होण्यासाठी घेतला रमी गेमचा आधार, पण झाला कर्जबाजारी; शेवटी... - Youth Suicide Case Thane

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 8:00 PM IST

Youth Suicide Case Thane : रमी गेम खेळण्याचा नाद एका 27 वर्षीय तरुणाच्या जीवावर उठला. गेममध्ये पैसा गुंतवण्यासाठी तो कर्जबाजारी झाला. अखेर त्यानं नैराश्यातून आत्महत्या केली. ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर पोलीस ठाण्य्याच्या हद्दीत घडली. चंदन अमृतालाल बिंद (वय, २७) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. वाचा सविस्तर प्रकरण...

Youth Suicide Case Thane
रमी गेमच्या नादी लागून आत्महत्या (File Photo)

ठाणे Youth Suicide Case Thane : २७ वर्षीय तरुणाने ऑनलाईन रमी गेमसाठी नातेवाईकांकडून लाखो रुपये कर्ज घेतले होते; मात्र त्याला रमी गेममध्ये यश आलं नाही. शिवाय उसण्या पैशासाठी नातेवाईक, मित्रमंडळीनी तगादा लावल्यामुळे त्याने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या करून जीवनयात्रा संपवली. ही दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी गावात घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चंदन अमृतालाल बिंद (वय, २७) असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

चंदन करायचा गॅरेजमध्ये काम : 'जंगली रमी पे आवो ना महाराज' म्हणत जाहिरात करून लाखोंचं बक्षीस जिंकण्याचं आमिष दाखविण्यात येते. विशेष म्हणजे, ह्या जाहिरातीमध्ये प्रसिद्ध अभिनेते असल्यानं त्याकडे तरुणाईचं आकर्षण वाढून ऑनलाईन रमी गेमच्या वाढत्या आमिषानं झटपट पैसा मिळेल या भावनेनं सध्या बहुसंख्येनं तरुण वर्ग या गेमकडे आकर्षित होत असल्याचं दिसून येत आहे. अशाच प्रकारे मृतक चंदन यालाही ऑनलाईन रमीचा नाद लागला होता. तो मूळचा उत्तरप्रदेश राज्यातील रहिवाशी असून नातेवाईकांकडे खर्डी येथे भाड्याच्या खोलीत राहून उदर्निवाहसाठी शहापूर येथील एका गॅरेजवर काम करत होता. विशेष म्हणजे, दोनच वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाल्यानं पत्नीला मूळ गावी सोडून चंदन हा गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून गॅरेजवर काम करत होता. चंदनला ऑनलाइन रमी गेमचं आकर्षण असल्यानं त्याला झटपट श्रीमंत व्हायचं होतं.

आत्महत्या करत असल्याचं नातेवाईकाला कळवलं : गेल्या काही महिन्यांपासून रमी गेम खेळण्याच्या नादात मृत चंदनने उत्तरप्रदेश आणि इतर ठिकाणी असलेल्या नातेवाईक, मित्रमंडळींकडून तब्बल ७ ते ७.५० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते; मात्र त्याला ऑनलाईन गेममध्ये यश न आल्यानं आणि दुसरीकडे नातेवाईक, मित्रमंडळींनी त्यांचे पैसे मागण्याचा सपाटा लावल्यानं अखेर त्याने २५ जुलै रोजी दुपारी खर्डी येथे नातेवाईकांच्या घरात एकटाच असताना आत्महत्या केली. खळबळजनक बाब म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं उत्तर प्रदेशमध्ये राहणाऱ्या वडिलांना मोबाईलवर संपर्क करून मी कर्जबाजारी झाल्यानं आत्महत्या करत असल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी वडिलांनी तातडीने चंदनला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी खर्डी येथील नातेवाईकांना सांगितलं. नातेवाईकांनी त्याला शहापूर शासकीय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत २५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास मालवली.

मृतकाच्या मामाच्या ताब्यात दिला मृतदेह : या घटनेचा तपास करणारे पोलीस हवालदार देवा जाधव यांच्याशी संपर्क साधला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच मृतक चंदनच्या वडिलांना संपर्क करून घटनेची माहिती दिली; मात्र त्या दिवशी राज्यभर मुसळधार पाऊस सुरू असल्यानं ट्रेन बंद होत्या. त्यामुळे त्याचे वडील आणि पत्नी येऊ शकली नाही. त्यानंतर त्याचे ठाणे येथे राहणाऱ्या मामाच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. त्यांनी मृतदेह ठाणे येथे नेऊन त्याच्यावर अंत्यविधी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार देवा जाधव करीत आहेत.

हेही वाचा :

  1. Sachin Tendulkar Online Gaming : सचिन तेंडुलकरनं ऑनलाइन रमीची जाहिरात करणं बंद करावं; उच्च न्यायालयात याचिका दाखल
  2. Online Gambling : ऑनलाईन जुगार फोफावतोय, कायद्याची नव्याने आखणी गरजेची
  3. ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी; कर्ज फेडण्यासाठी केला वृद्ध महिलेचा खून - Thane Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.