ETV Bharat / state

मेळघाटातील शेतकऱ्याला आधुनिक शेतीचा ध्यास; अडीच एकर पैकी अर्धा एकरमध्ये खोदले शेततळे - Shettale In Melghat - SHETTALE IN MELGHAT

Shettale In Melghat : आज पारंपरिक शेती किफायतशीर राहिली नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करूनच शेती करावी लागते. मेळघाटातील अनेक आदिवासी तरूण आधुनिक शेतीकडं वळत आहेत. असंच एका तरुण शेतकऱ्यानं अवघ्या अर्धा एकर जागेत शेततळे (Shettale) बांधून चांगल उत्पन्न घेतलं आहे.

Melghat Shettale
सातपुडा पर्वत रांगेत शेततळे (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 9:01 PM IST

Updated : Jun 12, 2024, 10:23 PM IST

अमरावती Shettale In Melghat : सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटच्या जंगलात स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पन्न घेतल्यावर आधुनिक शेतीकडं वाटचाल करताना, एका तरुण शेतकऱ्यानं आपल्या अवघ्या अडीच एकर शेतातील अर्धा एकर जागेत शेततळं बांधलं आहे. जागेच्या उपलब्धतेनुसार हे शेततळं त्रिकोणी आकाराचं बांधलं आहे. आपल्या शेतातील महत्त्वाची जागा शेततळ्यासाठी गुंतली असली तरी, शेततळ्याची ही गुंतवणूक विविध फळं, पीक आणि भाजीपाल्याच्या माध्यमातून आपल्याला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करेल असा विश्वास, या युवा शेतकऱ्याला आहे. गजानन शनवारी असं या शेतकऱ्याचं (Farmer Gajanan Shanware) नाव आहे. मेळघाटात चिखलदरालगत मोठा गावापासून काही अंतरावर जंगलामध्ये असणाऱ्या शेतीबाबत त्यांची आधुनिकदृष्टी ही शेतीच्या माध्यमातून समृद्धीकडं वाटचाल करणारी आहे. 'ईटीव्ही भारत' ने गजानन शनवार यांच्या समृद्ध शेती संदर्भात प्रत्यक्ष त्यांच्या शेतात जाऊन त्यांची धडपड जाणून घेतली.

मेळघाटच्या जंगलात अर्ध्या एकरमध्ये खोदले शेततळे (ETV BHARAT Reporter)

त्रिकोणी आकारात शेततळे : मेळघाटातील मोथा या गावात उत्तमराव येवले यांच्या शेतात, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पहिल्यांदा अस्तरीकरण शेततळ्याचा प्रयोग करण्यात आला. उत्तमराव येवले यांना वर्षभरात शेततळ्याच्या माध्यमातून होणारा फायदा लक्षात घेत गावातील प्रगतशील शेतकरी गजानन शनवारे यांनी देखील आपल्या अडीच एकर शेतात असं अस्तरीकरण शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला. उंच डोंगराच्या खाली उतरल्यावर लागणाऱ्या काहीशा पठारी भागात गजानन शनवारे यांचे अडीच एकर शेत आहे. या शेतात शेततळे बांधणे शक्य होणार नाही असं सांगण्यात आलं. असं असताना मनरेगाचे तांत्रिक अधिकारी विलास कळमाटे यांनी शनवारे यांच्या शेतात त्रिकोणी आकाराचे शेततळे बांधता येऊ शकते असा विचार मांडला. त्यानंतर शनवारे यांनी अर्धा एकर जमिनीवर त्रिकोणी आकाराचे शेततळे खोदण्यास सुरुवात केली.

या पावसाळ्यात भरणार शेततळे : गजानन शनवारे यांच्या शेतात त्रिकोणी आकाराचे शेततळे पोकलँड द्वारे खोदण्यात आले आहे. त्यानंतर या शेततळ्याचे कठडे योग्यपणे उभारण्यासाठी मजूर लावण्यात आले. खास सहा मायक्रॉनची प्लास्टिकची ताडपत्री या शेततळ्यासाठी आणण्यात आली. या शेततळ्यासाठी सुमारे सहा ते सात लाख रुपये खर्च आल्याचं गजानन शनवारे यांनी सांगितलं.

शेततळ्यामुळं बाराही महिने फळ पिकांचे उत्पन्न : मेघाटात दरवर्षी 1700 ते 2200 मिलिमीटर पाऊस पडत असला तरी, उंच पहाडावरून पावसाचे संपूर्ण पाणी खाली वाहून जाते. अशा परिस्थितीत शेतीसाठी पाणीच उपलब्ध नसल्यामुळं मेघाटात शेती करणं अतिशय कठीण आहे. आमच्या शेतात विहीर आहे, उन्हाळ्यात मात्र विहिरीला पाणी राहात नाही. उन्हाळ्यात शेतात कोणतेही पीक घेता येत नाही. आता शेततळं बांधल्यामुळं यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहील. स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नासह गव्हाचे उत्पन्न देखील वाढेल. यासोबतच टरबूज, खरबूज अशी फळं शेतात घेता येतील. लसूण आणि कांद्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात करता येईल. शेततळ्यात साचलेले पाणी ठिबक सिंचनद्वारे शेतात सर्वत्र पोहोचले की, उन्हाळ्यात देखील शेतात उत्पन्न घेता येईल असा विश्वास गजानन शनवारे यांनी व्यक्त केलाय.

शेतात आहे गोड गावराणी आंबा : गजानन शनवारे यांच्या शेतात सात ते आठ आंब्याची मोठी झाडं आहेत. या झाडांना अतिशय गोड गावरान आंबे उन्हाळ्यात लागले असून या शेतातला आंबा अमरावती, परतवाडा आणि चिखलदराच्या बाजारात विकला जातो. शेततळ्यामुळं उन्हाळ्यात आता आंब्याच्या सोबतच भाजीपाल्याचं देखील चांगलं उत्पन्न घेता येईल असं गजानन शनवारे सांगतात.

स्ट्रॉबेरी आहे प्रसिद्ध : अमरावतीच्या श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाच्या वतीनं 2014-15 मध्ये मेळघाटातील मातीचं परीक्षण करून चिखलदरा तालुक्यातील काही गावांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. त्यावेळी पहिल्यांदा मेळघाटात देखील स्ट्रॉबेरीचं उत्पन्न होऊ शकतं हे सिद्ध झालं. सुरुवातीला एकूण दहा-बारा गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरी लावली. गजानन शनवारे यांनी देखील आपल्या शेतात स्ट्रॉबेरी लावण्याचं धाडस केलं. विशेष म्हणजे आता दहा वर्षानंतर बोटावर मोजण्याइतकेच शेतकरी स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेत आहेत. विशेष म्हणजे या शेतकऱ्यांमध्ये गजानन शनवारे यांची स्ट्रॉबेरी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या प्रयत्नामुळं आज मोथा गावातली स्ट्रॉबेरी विशेष करून ओळखली जाते.

हेही वाचा -

  1. डरकाळी फोडत आला वाघ: मेळघाटच्या जंगलात पर्यटकांनी अनुभवला थरार; व्हिडिओ पाहून अंगावर येईल काटा - Melghat Tiger Reserve
  2. मेळघाटात गवळी बांधवांची घरवापसी; गुरांना चारा, पाणी मिळावं यासाठी सहा महिन्यासाठी केलं होतं स्थलांतर - CATTLE OWNERS RETURNED IN MELGHAT
  3. मेळघाटात चक्क आंब्याचं गाव! आंब्यानं बहरला आमझरी परिसर, काय आहेत गावाची वैशिष्ट्ये - Mango Village

Last Updated : Jun 12, 2024, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.