ETV Bharat / state

वरळी हिट अँड रन प्रकरण; आरोपी मिहीर शाहाचा वाहन परवाना होणार रद्द, पोलीस आरटीओला लिहिणार पत्र - Worli Hit And Run Case

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 9:16 AM IST

Worli Hit And Run Case : वरळी हिट अँण्ड रन गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिहीर राजेश शाह याचा वाहन परवाना रद्द होणार आहे. त्याचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलीस आरटीओला पत्र लिहिणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Worli Hit And Run Case
Worli Hit And Run Case (Source - ETV Bharat)

मुंबई Worli Hit And Run Case : वरळी परिसरातील एट्रिया मॉल समोर रविवारी 7 जुलै रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात कावेरी नाखवा या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. बीएमडब्ल्यू कारनं दुचाकीला धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला मंगळवारी विरार फाटा इथून अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत मिहीर शाह यानं अपघाताच्या वेळी कार आपण स्वतःच चालवत असल्याचं आणि मद्य प्राशन केलं असल्याचं कबूल केलं आहे. त्यानंतर आता पोलीस खूप मद्यपान करुन बेदारपणे कार चालवल्या प्रकरणी कायमचा वाहन परवाना रद्द करण्यासाठी वरळी पोलीस आरटीओला पत्र लिहिणार आहेत.

या प्रकरणात कला नगर इथं बीएमडब्ल्यू कार टोव्हिंग नेण्यासाठी आलेल्या आरोपी मिहीर शाहचे वडील राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली. तसेच मिहीर सोबत कारमध्ये असलेल्या राजरुशी राजेंद्रसिंह बडावत याला देखील अटक करण्यात आली. तब्बल 72 तासानंतर मंगळवारी विरार फाटा इथून मुख्य आरोपी असलेल्या मिहीर शाह याला भायखळा पोलिसांच्या मदतीनं वरळी पोलिसांनी अटक केली. तपासासाठी 12 ते 15 पोलिसांची पथकं कामाला लागले होते.

16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी : आरोपी मिहीर शाह याला न्यायालयानं 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आरोपी मिहीर शाह याच्या प्रेयसीसह 13 जणांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन वेळा क्राईम सिन रिक्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे. विरार फाट्या जवळ असलेल्या केटी रिसॉर्ट इथून आरोपी मिहीर शाह याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास त्याला अटक करण्यात आली.

मद्यप्राशन करत गाडी चालवत होता मिहीर : आतापर्यंत वरळी पोलिसांनी केलेल्या तपासात मुख्य आरोपी मिहीर शाह यानं जुहू येथील वाईस ग्लोबल बारमध्ये व्हिस्कीचे चार पेग, नंतर मालाड येथील बारमधून चार बियरचे कॅन घेतले असल्याचं कबूल केलं. मालाड ते मरीन ड्राईव्ह प्रवास करेपर्यंत गाडीत मिहीरनं दोन बियर कॅन संपवले. मात्र 72 तासानंतर मिहीरला अटक केल्यामुळे त्याच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण आढळून येणार नाही. मात्र तरी देखील वरळी पोलिसांनी मिहीरच्या लघवीचे आणि रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठवले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

  1. वरळी हिट अँड रन प्रकरणाचा 'सीन रिक्रियेट' होणार; आरोपी आणि ड्रायव्हरच्या जबाबात विसंगती - Worli Hit And Run Case
  2. भिवंडीत एकाच दिवशी दोन अपघात; 3 जणांचा मृत्यू, कसा घडला अपघात? - Road Accident News
  3. वरळी हिट अँड रन प्रकरण : आरोपी मिहिर शाहला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी, पीडित कुटुंबाला 10 लाख देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा - Worli hit and run case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.