ETV Bharat / state

गरीबांसह श्रीमंतांची पसंती असलेल्या वडापावचा शोध कोणी लावला? जागतिक वडापाव दिनानिमित्त वाचा खास माहिती - World Vada Pav Day - WORLD VADA PAV DAY

जागतिक वडापाव हा २३ ऑगस्टला साजरा केला जातो. मुंबईतील रस्त्यावर विविध स्टॉलमधून विक्री होणारा वडापाव देशभरात प्रसिद्ध आहे. जाणून घेऊ, वडापावची पाककृती कुणी शोधली, कशामुळे वडापाव लोकप्रिय ठरला?

World Vada Pav Day
जागतिक वडापाव (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 10:38 PM IST

मुंबई- वडापाव म्हटलं की तुमच्या तोंडाला लगेच पाणी येईल. महाराष्ट्राचं विशेषत: मुंबईचं सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थ अशी वडापावची ओळख आहे. मजूर असो की नोकरदार, सरकारी नोकरी करणारा अधिकारी असो की सेलिब्रिटी या सर्वांनाच वडापाव खाण्याचा मोह होतो. मुंबईतील रस्त्यांवर स्ट्रीट फूडमध्ये वडापाव खाण्यासाठी मुंबईकरांची नेहमीच गर्दी उसळलेली दिसते. अॅपल कंपनीचे सीईओ टीम कूक यांनीदेखील मुंबईत प्रथम आल्यानंतर अभिनेत्री माधुरी दिक्षीतबरोबर वडापावचा आस्वाद घेतला.

वडापाव अनेकांसाठी नाष्टा तर काहीजणांसाठी रात्रीचं जेवणदेखील आहे. जे लोक मुंबईत येतात, ते आवर्जून वडापावचा आस्वाद घेतात. गरीब असो की श्रीमंत एकंदरीत वडापावची आवड प्रत्येक वर्गामध्ये आहे. वडापावची मागणी पाहता अनेकांनी देशातच नव्हे तर विदेशातही वडापावची विक्री करणारे हॉटेल सुरू केले आहेत. त्यामुळे मुंबईतील वडापाव विक्रीचा व्यवसाय हा जगभरात होताना दिसत आहे.

वडापावच्या पाककृतीचा कोणी शोध लावला? वडापाव सर्वप्रथम तयार करण्याच श्रेय हे अशोक वैद्य यांना दिलं जाते. ते दादर रेल्वे स्टेशनबाहेर १९६६मध्ये वडापावची विक्री करायचे. त्यांनी तयार केलेला वडापाव मुंबईकरांना खूप आवडला. या चविष्ट खाद्यपदार्थाची माहिती संपूर्ण मुंबईत झाली. अशोक वैद्य हे बटाटा वडे, पोहे आणि चहा स्टॉलवरून विकायचे. त्यांनी सर्वप्रथम २३ ऑगस्टला वडापाव हा ग्राहकांना विक्री करण्यासाठी स्टॉलवर ठेवला. त्याचसोबत चटणीदेखील ग्राहकांना देण्यास सुरुवात केली. त्यानंतर वडापावची डिश ग्राहकांमध्ये कमालीची लोकप्रिय झाली. अशोक वैद्य यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी ६ जुलै १९९८ मध्ये निधन झाले. त्यांचे चिरंजीव नरेंद्र यांनी वडिलांचा वारसा चालवित दादर स्टेशनबाहेर वडापावची विक्री करण्यास सुरुवात केली.

मुंबईकर आणि वडापाव एक अजब समीकरण- फक्त मुंबईकरांनाच वडापावचं महत्त्व कळू शकते. कोणताही वर्ग, वय असो की व्यवसाय त्यांच्यासाठी वडापाव हा आवडीचा खाद्यपदार्थ आहे. धकाधकीच्या जीवनात सहज मिळणारा आणि चविष्ट पदार्थ असल्यानं वडापाव हा मुंबईकरांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्यामुळे मुंबईमधील अनेक रस्त्यांवर आणि उपनगरांमध्ये वडापावची विक्री होताना दिसून येते.

जगभरातील टॉप २० स्नॅक्समध्ये वडापावचा समावेश- वडापाव फक्त देशातच नव्हे तर विदेशातही चवीनं खाल्ला जातो. पॉप्युलर फूड आणि ट्रॅव्हल गाईड टेस्टअॅटलासकडून वडापावचा जगभरातील टॉप २० स्नॅक्समध्ये समावेश करण्यात आला आहे. जगभरातील बेस्ट सँडविचमध्ये वडापावचा समावेश करण्यात आला. करंट रॅकिंगच्या मार्च २०२४ मध्ये वडापावचा १९ वा क्रमांक आहे.

  • सेलिब्रिटींना वडापाव हा खाद्यपदार्थ कसा वाटतो? भारतरत्न, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या मते वडापाव हा एक अद्भुत पदार्थ आहे. सचिन तेंडुलकरनं सुनील गावस्कर यांचा ३४ शतकांचा २००६ मध्ये विक्रम मोडला होता. तेव्हा सचिनचा मित्र असलेल्या क्रिकेटपटू विनोद कांबळीनं काय भेट दिली असेल? विनोद कांबळीनं सचिनला चक्क ३५ वडापाव देऊन खूश केलं होतं.

वडापाव गर्ल- सोशल मीडियात वडापाव गर्ल नावानं प्रसिद्ध असलेली चंद्रिका दीक्षितनं केवळ वडापावच्या विक्रीतून स्वत:ची जगभरात ओळख निर्माण केली. ती बिग बॉस ओटीटी ३ शोमध्ये स्पर्धक म्हणून झळकली होती. दिल्लीच्या सैनिक विहारमध्ये वडापाव विक्रीपासून तिनं करियरला सुरुवात केली होती. ती वडापाव विक्री करून रोज ४० हजार रुपये कमविते. हा आकडा सुरुवातीला समोर आल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

  • गरम पावावर तेल टाकून पाव पॅनवर भाजला जातो. पावामध्ये वडा ठेवून ग्राहकांना दिला जातो. त्यासोबत लसणाची लाल चटणी आणि पुदिना असलेली हिरवी चटणी आणि तळलेल्या मिरच्या या तोंडी लावण्यासाठी दिल्या जातात.

ही आहेत मुंबईसह दिल्लीतील वडापाव मिळण्याचे काही लोकप्रिय ठिकाण

  • मुंबईत अशोक वडापाव, आराम वडापाव, शिवाजी वडापाव, ग्रुॅज्युअट वडापाव, गजानन वडापाव, धीरज वडापाव, खिडकी वडापाव, आनंद वडापाव, जम्बो किंग वडा पाव आणि सम्राट वडापाव हा लोकप्रिय आहे. दिल्लीमध्ये मुंबईप्रमाण असलेला वडा पाव मिळतो. जॉनीचा वडा पाव, मसाला ट्रेल, वडापाव जंक्शन, सुरुची आणि महाराष्ट्र सदन येथे चांगला वडापाव मिळतो, असे खाद्यप्रेमी सांगतात.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.