नाशिक Lok Sabha Election Results 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्कर भगरे आणि महायुतीच्या डॉ. भारती पवार यांच्यात चुरशीची लढत होती. अशात भगरे यांनी या निवडणुकीत बाजी मारली असली तरी या मतदारसंघात एक मोठा ट्विस्ट झाला. भास्कर भगरे यांच्या नामसाधर्म्य असलेले बाबू भगरे यांना या निवडणुकीत तब्बल 1 लाखाहून अधिक मते घेतली. कदाचित भगरे यांचा विजय काही हजार मतांनी निसटला असता तर भास्कर भगरे हे बाबू भगरे यांना कधीच विसरले नसते.
भास्कर भगरे यांचा विजय : शरद पवार गटाचे भास्कर भगरे आणि भाजपाच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यात सुरुवातीच्या काही फेरीत अटीतटीचा सामना रंगला. मात्र, चौथ्या फेरीनंतर भास्कर भगरे यांनी आघाडी घेत नंतर कायम ठेवत विजय संपादन केला. भास्कर भगरे यांनी माजी मंत्री डॉ. भारती पवार यांचा तब्बल 1 लाख 13 हजार दणदणीत पराभव केला. अशात अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना नामसाधर्म्य असल्याने तब्बल 1 लाख 3 हजार 26 मते आपल्या पदरात पाडून घेतली. नामसाधर्म्यामुळे काय घडू शकते आणि निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धींच्या नावाचा उमेदवार उभा करण्यावर विरोधकांचा का जोर असतो ते या उदाहरणावरून लक्षात येत आहे.
म्हणून बाबू भगरे यांना मिळाली एवढी मते : भास्कर भगरे यांच्या काही विरोधकांनीच बाबू भगरे यांचा प्रचार करीत लोकांना नवव्या क्रमांकाचे बटण दाबण्याचे आवाहन केले होते. यात ज्यांना फारसे लिहिता व वाचता येत नाही, अशा मतदारांनी भास्कर भगरे समजून नऊ नंबरचे बटण दाबले. चांदवड, कळवण आणि येवला मतदारसंघात अपक्ष उमेदवार बाबू भगरे यांना अधिक मते मिळाली आहेत. जर या लढतीत भास्कर भगरे यांचा निसटता पराभव झाला असता तर तर बाबू भगरेंना भास्कर भगरे कधीही विसरू शकले असते.
दिंडोरी मतदारसंघात उमेदवारांना मिळलेली मते:
भास्कर भगरे - 5 लाख 77 हजार 339
डॉ भारती पवार - 4 लाख 64 हजार 140
बाबू सदू भगरे - 1 लाख 3 हजार 26
हेही वाचा :
- मुंडे घराण्याला मोठा धक्का; पंकजा मुंडेंचा होम ग्राऊंडवर पराभव, बजरंग सोनावणी विजयी - Maharashtra lok Sabha election
- कोकणात नारायण राणेंचा डंका; विनायक राऊतांचा पराभव, नितेश राणेंकडून जल्लोष - Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Results 2024
- महाराष्ट्रात धक्कादायक निकाल; 'या' उमेदवारांना दाखवला घरचा रस्ता, निकालाचं विश्लेषण वाचा एका क्लिकवर - Lok Sabha Election 2024 Results