ETV Bharat / state

एक विहीर 'बाराद्वारी'; विहिरीच्या आत खोल्या अन् दगडांवर कोरली देवांची चित्रं - BARADWARI WELL

विहिरीच्या टोकावर असणाऱ्या दगडांवर देवांच्या मूर्तीचं अतिशय सुबक कोरीव काम थक्क करणारं आहे. अमरावतीत वरुडमधील पवनी सक्राजी गावात सातपुते यांच्या शेतात ही ऐतिहासिक विहीर आहे.

Baradwari well
विहिरीच्या आत खोल्या, दगडांवर कोरली देवांची चित्र (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 9, 2024, 4:16 PM IST

Updated : Dec 9, 2024, 5:25 PM IST

अमरावती - जिल्ह्यात एका विहिरीला 12 दारं असल्यानं तिचं नाव बाराद्वारी पडलं असून, केवळ 12 दारं हेच या विहिरीचं वैशिष्ट्य नसून ही बाराही दारं विहिरीच्या आतमध्ये आहेत. तसेच विहिरीपासून पाच ते सहा फूट अंतरावर जमिनीच्या आत असणाऱ्या भुयारात पायऱ्यांनी उतरून विहिरीमध्ये जाऊन आगळं वेगळं वैभव पाहायला मिळतंय. विहिरीच्या आत असणाऱ्या एकूण 12 दारांमधून विहिरीच्या आतमध्ये खोलवर असणारं पाणी पाहता येतं आणि वर गोलाकार आकाश दिसतं. आतमध्ये चक्क दोन-तीन खोल्यांसारखी दालनं असून, मूर्ती नसणारं भव्य मंदिरदेखील या विहिरीत पाहायला मिळतं. विहिरीच्या टोकावर असणाऱ्या दगडांवर देवांच्या मूर्तीचं अतिशय सुबक कोरीव काम थक्क करणारं आहे. अमरावती जिल्ह्यात वरुड तालुक्यात पवनी सक्राजी या गावात सातपुते यांच्या शेतात ही ऐतिहासिक विहीर आहे. 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी शशांक लावरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट...

असं आहे विहिरीचं वैशिष्ट्य : ही विहीर काळ्या पाषाणासोबतच खरपाच्या साहाय्यानं बांधण्यात आलीय. विहिरीच्या वर उंचावर एक हौद आहे. दोन मोटीच्या सहाय्यानं या टाक्यांमध्ये मोठा दोरखंड लावून बैलांद्वारे पाणी ओढून साठवण्याची व्यवस्था केल्याचं इथे पाहायला मिळते. याच ठिकाणी दगडांवर भगवान विष्णू, राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. तीनमुखी दत्त हातात कमंडलू घेऊन असणारी मूर्ती दगडात अतिशय सुरेख कोरलेली आहे. यासोबतच लहान मुलाला घोडेस्वारी शिकवताना त्याचे वडील, घोड्यांवर चाललेलं सैन्य, नाक, तोंड, डोळे असणारा सूर्य, विविध फुलं यांसह अनेक दगडांवर फुलदाणी अतिशय सुबकरीत्या कोरलेली विहिरीवर पाहायला मिळते. विहिरीवरून पाहिलं तर आतमध्ये एखादा भव्य महल असावा असंच वाटतं. एकूण बारा दारं गोलाकार आकारात अतिशय सुंदररीत्या या विहिरीमध्ये दिसतात आणि वरून पाहताना या दारांच्या आत नेमकं काय असावं, असं कुतूहल निर्माण होतं.

विहिरीच्या आत खोल्या, दगडांवर कोरली देवांची चित्र (ETV Bharat Reporter)

विहिरीत उतरायला भुयारी रस्ता : ही विहीर पाहताना विहिरीत नेमकं उतरण्याची व्यवस्था कशी असावी, असं लक्षात येतं. मात्र नेमकं कुठून उतरता येईल हे अजिबात लक्षात येत नाही. विहिरीपासून अवघ्या चार ते पाच फूट अंतरावर एका छोट्याशा खड्ड्यात काही तुटलेल्या अवस्थेत असणाऱ्या पायऱ्या दिसतात. हा खड्डा म्हणजे विहिरीत उतरण्यासाठी असणारा भुयारी मार्ग असल्याचं यामध्ये उतरल्यावर लक्षात येतं. एक-दोन वळणं घेऊन या भुयारी मार्गानं खाली उतरल्यावर विहिरीच्या आतमध्ये एक अनोखं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला लक्षात येतो. विहिरीच्या आतमध्ये एक भव्य दालन असून, त्यामध्ये शिरल्यावर एकूण नऊ ठिकाणी गाभारे तयार केलेले दिसतात. वर पाहिलं तर नक्षीदार घुमट नजरेत भरतो. या मंदिरातील गाभाऱ्यांमध्ये देवांच्या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वीच इथलं काम थांबलं असावं, असं जाणवतं. यासोबतच बाजूला एक छोटीशी खोली आहे. वर गोलाकार फिरता येईल, असा छानसा वरंडाच या विहिरीमध्ये दिसतो.

Baradwari well
बाराद्वारी विहीर (Source- ETV Bharat Reporter)

विहिरीतील एक मंदिर अपूर्ण : ही विहीर अंदाजे 140 वर्षांपूर्वीची असावी. आमच्या गावातील गोपाळराव सातपुते यांनी ही विहीर बांधली, असं सांगितलं जातंय. या विहिरीसोबतच त्यांनी गावात एक मंदिरदेखील बांधलं होतं. बारा दारं असणाऱ्या या विहिरीतदेखील मंदिर असावं, असं त्यांचं स्वप्न होतं. या भव्य विहिरीचं काम पूर्ण झालं असलं तरी या विहिरीत मंदिर बांधण्याचं काम अपूर्णच राहिलं, असं पवनी सक्राजी येथील रहिवासी पंढरी साबळे यांनी 'ईटीव्ही भारत 'शी बोलताना सांगितलं. गावात असणारं सातपुते कुटुंब हे अतिशय श्रीमंत होतं. गोपाळराव सातपुते यांचे आजोबा सक्राजी यांच्या नावामुळेच आमच्या पवनी गावासमोर सक्राजी, असा उल्लेख केला जातो. पुढे सातपुते कुटुंबानं अरबट यांच्या घरातील एका मुलाला दत्तक घेतलं. आज ही विहीर तेव्हाचे सातपुते आणि आता अरबट यांच्या मालकीच्या शेतात आहे, असं देखील पंढरी साबळे म्हणाले.

जिकडे तिकडे काळी माती : वरुड तालुक्यात येणारं पवनी सक्राजी या गावात काळीशार जमीन आहे. ज्या शेतात ही ऐतिहासिक विहीर आहे, त्या शेतासह लगतच्या सर्व शेतांमध्ये 40 फुटांपर्यंत नुसती काळी माती आहे. अशा काळ्या मातीमध्ये एखादं बांधकाम करणं अतिशय अवघड असताना ही विहीर या काळ्या मातीत बांधणं हे अतिशय अवघड आणि आश्चर्यकारक आहे. ही विहीर बांधण्याकरिता जमिनीच्या खाली खोलवर अतिशय मजबूत पाया उभारला असावा आणि या विहिरीच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड हे बाहेरून कुठून तरी आणले असावे, असं पंढरी साबळे म्हणालेत.

शेतात सिंचनासह ग्रामस्थांची तहान भागवणारी विहीर : पवनी सक्राजी येथील ही विहीर खरंतर आश्चर्याचा नमुनाच आहे. या विहिरीच्या पाण्यानं शेतात सिंचन करणं आणि दुष्काळी परिस्थितीत ग्रामस्थांची तहान भागवणं हा उद्देश जाणवतो. मात्र विहीर बांधण्याकरिता इतकी अप्रतिम कलाकृती निर्माण होणे हे मोठं आश्चर्यच, असं वरुड तालुक्यातील जरूड येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त महसूल उपायुक्त शेषराव खाडे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. या ठिकाणी विहिरीवर दोन मोट आहेत. या मोटांवर मजबूत दोरखंड बांधून बैलांच्या सहाय्यानं पाणी वर आणण्याची व्यवस्था आहे. विहिरीच्यावर एका हौदात पाणी तुडुंब भरल्यावर ते बाहेर पडण्याकरिता बैलांच्या प्रतिमा अतिशय सुबक अशा पाषाणात तयार करून लावण्यात आलेल्या आहेत. या विहिरीच्या दगडांवर अतिशय सुबक आणि नक्षीदार असं कोरीव काम नजरेत भरणार असून, अमरावती जिल्ह्यातील ही विहीर सर्वांनी पाहावी इतकी सुंदर आहे. पुरातत्त्व विभागाच्या वतीनं या विहिरीचं जतन होणं गरजेचं आहे, असंदेखील शेषराव खाडे म्हणालेत.

विहीर पेशवेकालीन असल्याचा अंदाज : पवनी सक्राजी येथील विहिरीसारख्या एक, दोन विहिरी मध्य प्रदेशातील काही गावांमध्ये पाहायला मिळतात. विहीर बांधण्याची ही शैली 1818 पूर्वी पेशवेकालीन असल्याचा अंदाज इतिहासाचे अभ्यासक प्रा. डॉ. वैभव मस्के यांनी 'ईटीव्ही भारत ' शी बोलताना व्यक्त केला. विशेष म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या नावाचा अर्थ असणारं गोपाळ हे नाव महाराष्ट्रात एखाद्या व्यक्तीच ठेवण्याचा प्रघात हा साधारण 250 वर्षांपूर्वी आला असं दिसून येतं. तत्पूर्वी अभावानच गोपाळ हे नाव आढळतं, असंदेखील वैभव मस्के सांगतात.

हेही वाचा-

  1. "विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय..."; राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितलं
  2. समाजवादी पक्ष भाजपाची बी टीम असल्यासारखं वागत आहे- आदित्य ठाकरे

Last Updated : Dec 9, 2024, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.