ETV Bharat / state

"महिलांसाठी अधिक काम...", नेमकं काय म्हणाल्या राष्ट्रपती? - President Draupadi Murmu - PRESIDENT DRAUPADI MURMU

Vidhan Parishad Shatak Mahotsav 2024 : देशाच्या लोकसंख्येत महिलांचा अर्धा वाटा आहे. तसाच देशाच्या विकासात सुद्धा महिलांचा अर्धा वाटा आहे. मात्र, अजूनही अनेक क्षेत्रांमध्ये आणि अनेक बाबतीत महिलांकडं दुर्लक्ष होत असून याबाबतीत काम करण्याची गरज असल्याचं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केलंय. विधानपरिषद शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

Vidhan Parishad Shatak Mahotsav 2024 President Draupadi Murmu says Need to do more work for women
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 3, 2024, 9:42 PM IST

मुंबई Vidhan Parishad Shatak Mahotsav 2024 : विधानपरिषद शतक महोत्सवी वर्षानिमित्त विधिमंडळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठांच्या सभागृहाचे महत्त्व आणि आवश्यकता या विषयावरील ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं. यावेळी राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधिमंडळाचे सदस्य उपस्थित होते.

2019 ते 2023 पर्यंतच्या उत्कृष्ट संसदपटूंचा सत्कार : यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 2019 ते 2023 या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण देणाऱ्या विधिमंडळ सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये निरंजन डावखरे, नीलम गोऱ्हे, विजय थोरात, संजय कुटे ,सुरजितसिंह ठाकूर, हुस्न बानो खलीफे, पराग अळवणी, ॲड.आशिष शेलार अनंत गाडगीळ ,मनीषा कायंदे, विनायक मेटे, प्रवीण दरेकर, बाळाराम पाटील, प्रताप सरनाईक, सरोज अहिरे, यामिनी जाधव ,सदाशिव खोत ,अनिकेत तटकरे, संजय शिरसाट, प्रशांत बंब, गोपीकिशन बाजोरिया, सुनील प्रभू यांच्यासह अन्य विधिमंडळ सदस्यांचा समावेश होता.

महिलांच्या कार्यकर्तृत्वाला वाव मिळावा : यावेळी बोलत असताना महाराष्ट्राच्या विधिमंडळानं आजवर अनेक महत्त्वाचे कायदे पारित केले आणि जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेत, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. तसंच छत्रपती शिवरायांना आपण वंदन करत असून छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्याचंही त्या यावेळी म्हणाल्या. पुढं त्या म्हणाल्या की, "महाराष्ट्रानं अनेक दिग्गज नेते देशाला दिलेत. तर महिला क्षेत्रातही महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलाय. देशाच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्राच्याच होत्या. तसंच सध्याही महाराष्ट्राच्या विधिमंडळात उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, पोलीस प्रशासनाच्या प्रमुख रश्मी शुक्ला आहेत. महाराष्ट्र हा नेहमी महिलांना सन्मान देताना दिसतो. मात्र, काही बाबतीत महिलांकडं दुर्लक्ष होत असून यासाठी अजूनही काम करण्याची आवश्यकता असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करतो : यावेळी बोलताना राज्यपाल सी पी राधाकृष्ण म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील देशाची घटना लिहून या महाराष्ट्राची मान जगभरात उंचावली. बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवरच आज आपण वाटचाल करत आहोत. दोन्ही सभागृह त्याच घटनेच्या आधारावर चालतात. महाराष्ट्र हा नेहमी देशात अग्रेसर राहिलाय. महाराष्ट्रानं सर्वात अगोदर कायदे लागू करण्याचा आणि नवीन कायदे तयार करून ते जनतेच्या हितासाठी वापरण्याचा पायंडा पाडला आहे. महिला आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारनं सर्वात अधिक निर्णय घेतलेत. तर त्याहीपूर्वी 1970 मध्ये महाराष्ट्रानं राबवलेला रोजगार हमी कायदा आज देशभरात राबवला जातोय. त्याचे श्रेय सुद्धा महाराष्ट्राला जातं."

हेही वाचा -

  1. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंचा आज कोल्हापूर दौरा, दिवसभरात 'हे' असणार कार्यक्रम - Droupadi Murmu Kolhapur visit

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.