ETV Bharat / state

शरद पवारांचं राजनाथ सिंहांशी काय बोलणं झालं?- प्रकाश आंबेडकरांचा सवाल - Prakash Ambedkar Slams Sharad Pawar - PRAKASH AMBEDKAR SLAMS SHARAD PAWAR

Prakash Ambedkar Slams Sharad Pawar : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवर काय बोलणं झालं, याबाबत खुलासा करावा, असं आव्हान त्यांनी दिलं.

Prakash Ambedkar Slams Sharad Pawar
संपादित छायाचित्र (ETV Bharat Marathi)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 1:26 PM IST

Updated : May 9, 2024, 4:40 PM IST

बीड Prakash Ambedkar Slams Sharad Pawar : "कोण पाकिस्तान बरोबर आहे आणि कोण पाकिस्तान बरोबर नाही, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं. मुंबईतला प्रचार ज्यावेळेस सुरु होईल, त्यावेळेस या सर्व गोष्टीची उत्तरं त्यांना द्यावी लागतील," असा हल्लाबोल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. "राजनाथ सिंह यांच्यासोबत फोनवरून शरद पवारांनी काय बोलणं झालं, हे सांगावं. मी जर पंतप्रधान मोदींशी बोललो तर लोक वेगळा अर्थ काढतील, असं त्यांना वाटलं असावं. त्यामुळे शरद पवार राजनाथ सिंह यांच्यासोबत काय बोलले? हे त्यांनी सांगावं," असं आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिलं.

संभाजी महाराजांना पकडून देणारे कोण होते ? : यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी मोठा आरोप केला. "औरंगजेबाच्या मजारवरती आम्ही चादर चढवायला गेलो होतो. छत्रपती संभाजी महाराजांचा जो छळ झाला, त्याला औरंगजेब जबाबदार होता, असा नॅरेटीव्ह सेट करण्यास सुरुवात झाली. मुळात माझं म्हणणं असं आहे, की संभाजी महाराजांना पकडून देणारं कोण होतं ? हे त्यातलं महत्त्वाचं आहे. मी त्यावेळेस हे नाव दिलं होतं. त्याच्यानंतर औरंगजेबाकडं सजा देणारा हिंदू धर्मातील तो कोण होता ? त्याचं देखील नाव मी दिलं आहे. संभाजी महाराज यांचं वेदांमध्ये प्रावीण्य होतं. त्या काळात वेदांमध्ये प्रावीण्य असणाऱ्या माणसाची कशा तऱ्हेनं हत्या करावी ? कशाप्रकारे छळ करावा ? हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. जे कोणी प्रचार करतात, त्या सगळ्यांना माझं आव्हान आहे, संभाजी महाराजांवर झालेला अत्याचार आणि मनुस्मृतीमध्ये दिलेला अत्याचार हा त्यांनी वाचावा आणि नंतर त्यांनी प्रचार करावा."

चोराच्या मनामध्ये चांदणं : "घटना बदलणार म्हटल्यानंतर आरक्षण जाणार हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे आरक्षण जाणार नाही, जे सांगतात हे चुकीचं आहे. जर घटना बदलणार अशी चर्चा सुरू झाली नसती, तर आरक्षणाची चर्चा झाली नसती. त्यामुळे आम्ही घटना बदलणार आहोत किंवा नाही याविषयीचा खुलासा अजूनही पंतप्रधानांनी केला नाही. त्यामुळे ज्याला टॉसिंग म्हणतो त्या पद्धतीनं या विषयाला पंतप्रधान टॉसिंग करतात, बाकी काही नाही."

देशाचे पंतप्रधान खोटं बोलतात : बीड मतदारसंघात शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे हे उमेदवार फुसके आहेत, ते भाजपानं पाठवलेले उमेदवार आहेत. त्यामुळे ही खरी लढाई अशोक हिंगे विरुद्ध पंकजा मुंडे आहे. तर बजरंग सोनवणे यांना मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकार नाही. अनेक आंदोलन झाली त्यावेळी अशोक हिंगे यांनी त्यात सक्रिय भाग घेतला. बजरंग सोनवणे हे कुठेही दिसले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खोटं बोलत आहेत की आम्ही संविधान बदलणार नाही. प्रत्येक वेळी त्यांची भाषा बदलते, त्यामुळे त्यांनी खोटं बोलणं सोडावं. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला सर्वांनी पाठिंबा देऊन भरघोस मतांनी निवडून द्यावं, असं प्रकाश आंबेडकर यांनी आवाहन केलं.

सगळ्यांना संपवायचं काम शरद पवारांनी केलं : "बजरंग सोनवणे एनसीपीचे शरद पवारांचे उमेदवार आहेत. त्यांना मतदान करू नये, याचं आवाहन मी मराठा बांधवांना करतो. मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका घेतली आहे का नाही, नरेंद्र मोदींनी भूमिका घेतली आहे का अजिबात नाही. जरांगे पाटील यांनी उभं केलेलं आंदोलन नव्हे, मानत नाही. मी 1980 पासून अण्णाराव पाटील यांनी उभं केलेल आंदोलन ते शशिकांत पवार नंतर वेगवेगळ्या 'छावा' संघटना त्याच्यानंतर वेगवेगळ्या असणाऱ्या जिजाऊ संघटना या सगळ्यांना संपवायचं काम कोणी केलं असेल, तर ते शरद पवार यांनी केलं आहे," असाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.

हेही वाचा :

  1. "शरद पवार आणि राजनाथ सिंह यांचं सेटलमेंट...", प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप, राजकीय वाद पेटणार? - Prakash Ambedkar
  2. प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानं खळबळ; म्हणाले, उद्धव ठाकरे भाजपासोबत.... - Lok Sabha Election 2024
  3. 2014 नंतर 17 लाख हिंदू कुटुंबांनी नागरिकत्व का सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भागवत यांना सवाल - Lok Sabha Election 2024

Last Updated : May 9, 2024, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.