ETV Bharat / state

मॅगी आणायला जाणाऱ्या मुलींना भरधाव कारची धडक, कारचालक फरार; सीसीटीव्ही पाहून अंगावर येईल काटा - Mumbai Accident

Mumbai Accident : मुंबईच्या महालक्ष्मी परिसरात मॅगी आणायला जात असलेल्या दोन चिमुकल्या मुलींना भरधान कारनं धडक दिल्यानं या दोन्ही चिमुकल्या जखमी झाल्या आहेत. या दोघींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Mumbai Accident
मॅगी आणायला जाणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींना भरधाव कारची धडक; जखमी मुलींवर उपचार सुरु, कारचालक फरार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 9:53 AM IST

Updated : Apr 21, 2024, 11:10 AM IST

मॅगी आणायला जाणाऱ्या मुलींना भरधाव कारची धडक

मुंबई Mumbai Accident : मुंबईच्या महालक्ष्मी परिसरातून भरधाव वेगानं जात असलेल्या कारच्या धडकेमध्ये दहावीतील दोन शाळकरी मुली गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडलीय. या दोघींवर नायर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात भारतीय दंड विधान कलम 279, 338 मोटर वाहन कायदा कलम 84, 134 (अ), 134 (ब) अन्वये गुन्हा दाखल करुन गावदेवी पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक भोसले यांनी दिलीय.

मॅगी आणायला जाताना कारची धडक : महालक्ष्मी मंदिर कंपाऊंड परिसरात राहात असलेल्या दोन चिमुकल्या येथील एका शाळेमध्ये दहावीत शिकतात. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास त्या मॅगी आणण्यासाठी रस्त्याच्या पलीकडं असलेल्या दुकानात जात होत्या. या दरम्यान रस्ता ओलांडत असताना एका सोनेरी रंगाच्या कारनं त्यांना जोराची धडक दिली. यात या दोघी गंभीर जखमी झाल्या. या अपघातानंतर कार चालक मात्र पसार झाला. अखेर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना देत दोघींना उपचारासाठी नायर रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. हा अपघात भुलाभाई देसाई रोडवर झाला असून अपघातानंतर कॅटबरी जंक्शनच्या दिशेनं ब्रीच कँडीकडं यातील आरोपी पळून गेला असून या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल : या घटनेची नोंद करुन तपास करत असलेल्या गावदेवी पोलिसांनी चिमुकलीच्या वडिलांची तक्रार नोंदवून घेत याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय. या जखमी झालेल्या दोन्ही मुलींची बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि शिवसेना प्रवक्त्या सुशीबेन शाह यांनी भेट घेतली असून जखमी मुलींच्या प्रकृतीची चौकशी केलीय. 24 तास उलटून गेल्यानंतर चिमुकलीच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. तर दुसऱ्या जखमी मुलीवर उपचार करण्यात येत आहेत.

हेही वाचा :

  1. कर्नाटकच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; क्रूझर ट्रॅव्हल्सवर आदळून 5 जण ठार, तर 15 जण जखमी - Sangli Road Accident
  2. शिर्डीत पायी पालखीचा भीषण अपघात; एका महिलेचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर - Palkhi Accident in Shirdi
  3. कामावरुन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; माती वाहणारा टिप्पर उलटून 5 जणांचा बळी - Bagalkot Accident

Last Updated : Apr 21, 2024, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.