ETV Bharat / state

लाडक्या बाप्पाला निरोप देताना काळाचा घाला; दोघांचा पूर्णा नदी बुडून मृत्यू - Two Drowned In Purna River

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 23 hours ago

Updated : 23 hours ago

Two Drowned In Purna River : गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन व्यक्तींचा पूर्णा नदीपात्रात (Purna River) बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमरावतीच्या अचलपूर परिसरातील ही घटना घडली आहे.

Two Drowned In Purna River
गणपती विसर्जन करताना दोघे बुडाले (ETV BHARAT Reporter)

अमरावती Two Drowned In Purna River : इसापूर गावातील दोन व्यक्ती पूर्णा नदीपात्रात (Purna River) गणपती विसर्जन करताना बुडाल्यानं खळबळ उडाली आहे. अमोल विष्णू ठाकरे (45) आणि मयूर गजानन ठाकरे (25) अशी मृत व्यक्तींची नावं आहेत. या दोघांचेही मृतदेह आज सकाळी बचाव पथकाला सापडले. तर मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली.

गणपती विसर्जनादरम्यान पूर्णा नदीवर खळबळ : अचलपूर तालुक्यातून वाहणार्‍या पूर्णा नदीत अचलपूर, अंजनगाव, अमरावती तालुक्यातील अनेक गावांमधून गणपती विसर्जनाकरता येतात. मंगळवारी सायंकाळी गणपती विसर्जनाकरता नदीवर गर्दी उसळली होती, सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास अमोल ठाकरे आणि मयूर ठाकरे हे दोघे गणपती विसर्जन करताना नदीत बुडाल्यानंं परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच, जिल्हा आपत्कालीन विभाग बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं. रात्री उशिरापर्यंत नदीमध्ये शोध मोहीम सुरू होती.

सकाळी आढळले मृतदेह : रात्री अंधार पडल्यामुळं बचाव पथकानं शोधकार्य थांबवलं होतं. आज सकाळी सात वाजता बचाव पथकाने पुन्हा एकदा नदीत शोध कार्य सुरू केलं. सकाळी साडेनऊ वाजता नदीत असणाऱ्या खोल डोहात शोध घेतला. यावेळी मयूरचा मृतदेह घटनास्थळापासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाटुंडा गावाजवळ आढळला. अमोल ठाकरे यांचा मृतदेह शोधण्याचा प्रयत्न पथकानं सुरूच ठेवला असता, सकाळी दहा वाजून 25 वाजता अमोलचा मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागला. यावेळी लगतच्या ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर यांच्या नेतृत्वात बचाव पथकाला दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं. तर गणपती विसर्जना दरम्यान गावातील दोन व्यक्तींचा पूर्णा नदीत बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेमुळं, इसापूर गावावर शोककळा पसरली. तर या घटनेनंतर संपूर्ण रात्रभर अख्खं गाव जागं होतं.

हेही वाचा -

  1. Four Drowned In Kanhan River : नदीत पोहण्याचा मोह जीवावर बेतला; तरुणीसह चौघांचा बुडून मृत्यू
  2. Devotees Drowned In Chambal : करौली देवीच्या दर्शनासाठी गेलेले 18 भाविक चंबळमध्ये बुडाले
  3. वाढदिवसाची पार्टी बेतली जीवावर.. नदीत बुडून पाच मुलांचा मृत्यू.. अंघोळीसाठी उतरले होते पाण्यात

Last Updated : 23 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.