ETV Bharat / state

रेल्वेत कॉलेज तरुणीचा विनयभंग; ट्रेन अटेंडंटला अटक, पीडिता पिकनिकसाठी आली होती मायानगरीत - रेल्वेत कॉलेज तरुणीवर विनयभंग

Molesting College Student : मुंबई शहरात विनयभंग प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचं मागील काही दिवसांच्या आकडेवारीवरुन समोर येतंय. असाच एक प्रकार रेल्वेत प्रवास करणाऱ्या कॉलेज तरुणीसोबत घडलाय. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक (Train Attendant Arrested) केलीय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 7:59 AM IST

Updated : Feb 24, 2024, 8:15 AM IST

मुंबई Molesting College Student : रेल्वेमध्ये एका कॉलेजच्या तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी (CSMT Railway Police) १९ वर्षीय रेल्वे अटेंडंटला अटक (Train Attendant Arrested) केलीय. ही घटना २१ फेब्रुवारीच्या रात्री घडली होती. याप्रकरणी प्रथम ठाणे रेल्वे पोलिसांकडं गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण सीएसएमटी रेल्वे पोलिसांकडं वर्ग करण्यात आलं होतं.

तरुणीचा रेल्वेत विनयभंग : मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज तरुणी ही मूळची छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आहे. फिरण्यासाठी ती मित्रांसोपबत मुंबईत आली होती. पीडित तरुणीनं मुंबई फिरण्याचा आनंद घेतला आणि परत रेल्वेनं परतीचा मार्ग धरला. २१ फेब्रुवारीला देवगिरी एक्स्प्रेसनं संभाजीनगरला जात असताना त्यावेळी रेल्वेमध्ये आरोपीनं तरुणीला स्पर्श केला. तिनं आरडाओरडा केला असता, तिच्या मित्रांनी आणि प्रवाशांनी आरोपीला पकडलं.

प्रवाशांनी पकडलं आरोपीला : रेल्वे ही सीएसएमटीहून संभाजीनगरला जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. यावेळेतच प्रवाशांनी आरोपीला पकडलं होतं. त्यामुळं रेल्वे ठाणे स्थानकात रेल्वे थांबली असता आरोपीला रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं. दीपक पार्टे असं आरोपीचं नाव असून, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी हा 19 वर्षीय ट्रेन अटेंडंट म्हणून कार्यरत आहे.

गुन्हा दाखल : ठाणे रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरण सीएसएमटी पोलिसांकडं वर्ग केलंय. पुढील तपास सुरु असल्याची माहिती मुंबई रेल्वे पोलिसांकडून देण्यात आलीय.

सहलीला गेलेल्या विद्यार्थिंनींचा विनयभंग : दरम्यान, शाळेच्या विद्यार्थिंनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यात घडला होता. सहलीला गेलेल्या विद्यार्थिंनींसोबत हा प्रकार घडला होता. या प्रकरणी बुधवारी (21 फेब्रुवारी) ठाण्यातील कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये खासगी बस अटेंडन्ट जावेद मोहम्मद नवी खानवर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा -

  1. सहलीत विद्यार्थिंनीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक, शालेय प्रशासनावर गुन्हा दाखल करण्याची पालकांची मागणी
  2. 'प्लीज प्लीज मला एक किस द्या ना!' अस बोलून पुण्यात वयोवृद्ध नागरिकाकडून महिलेचा विनयभंग
  3. क्रूरतेचा कळस! तरुणाला बेदम मारहाण, लघुशंका केलेल्या मातीचा तोबरा भरून भुवया उपटल्या

Last Updated : Feb 24, 2024, 8:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.