नवी दिल्ली SC On Ramdev Apology : विविध रोगांवर उपचारांचा दावा करणाऱ्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या संदर्भात स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण, पतंजलीचे एमडी यांनी दाखल दिलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयानं आज (10 एप्रिल) फेटाळला.
पतंजलीच्या खोट्या साक्षींकडे वेधले लक्ष : न्यायमूर्ती हिमा कोहली आणि अहसानुद्दीन अमानुल्ला यांचा समावेश असलेल्या खंडपीठानं सांगितलं की, न्यायालय आंधळं नाही. बाबा रामदेव तसंच बाळकृष्ण यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, त्यांनी माफी मागितलेली कोर्टाला पटलेली नाही. खंडपीठाने सांगितले की, ते कारवाई अतिशय हलक्यात घेत आहेत आणि त्यांनी न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांबाबत केलेल्या खोट्या साक्षीकडे देखील लक्ष वेधलं.
हे तर वचननाम्याचे उल्लंघन : सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, ते रामदेव आणि बाळकृष्ण यांची माफी स्वीकारत नाहीत आणि न्यायालय हे जाणूनबुजून, जाणीवपूर्वक केलेल्या वचननाम्याचं उल्लंघन मानते. "आम्ही या प्रकरणात उदार होऊ इच्छित नाही." खंडपीठ म्हणाले की, त्यांची पाठ भिंतीला लागून आहे आणि ते चुकीच्या मापदंडावर पकडले गेले आहेत.
समाजात संदेश जायला हवा, यावर दिला भर : न्यायमूर्ती कोहली म्हणाले की, आम्ही तुमच्या माफीनाम्याला न्यायालयाच्या हमीपत्राप्रमाणेच तुच्छतेने का वागवू नये? समाजात संदेश जायला हवा, यावर सर्वोच्च न्यायालयाने भर दिला. पतंजली विरोधात कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने उत्तराखंड सरकारच्या वकिलांवर ताशेरे ओढले. त्यावर सुनावणी सुरू आहे.
काय आहे प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या 'भ्रामक' जाहिरातींवर बंदी घातली आहे. न्यायालयाने कंपनीला चांगलंच फटकारलं आणि आजपर्यंत कंपनीवर कारवाई का केली नाही, अशी विचारणाही केली आहे. तसंच, सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदच्या "भ्रामक" जाहिरातींबद्दल कडक शब्दात फटकारलं आहे. तसंच, कंपनीवर कारवाई का केली नाही, अशी विचारणा केली. पतंजली आयुर्वेदच्या आरोग्याशी संबंधित सर्व जाहिरातींवरही न्यायालयाने बंदी घातली आहे. भविष्यातही कंपनी अशा जाहिराती करू शकणार नाही.
हेही वाचा:
- भगवंत मान आणि संजय सिंह आज केजरीवालांना भेटू शकणार नाहीत, तिहार प्रशासनानं नाकारली परवानगी - Arvind Kejriwal in Jail
- माजी आयएएस अधिकाऱ्याकडून रामलल्लाच्या चरणी 5 कोटी रुपयांचं रामायण अर्पण, तब्बल सात किलो सोन्याची आहेत पाने! - GOLDen RAMAYANA
- . . .तेव्हाच राज ठाकरे यांची लाईन क्लिअर होती, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल - Supriya Sule On Raj Thackeray