ETV Bharat / state

अश्लील फोटो पसरवण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल होताच आरोपीची आत्महत्या - आरोपीची आत्महत्या

Thane rape : अश्लील फोटो पसरवण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीनं आत्महत्या केल्यामुळं खळबळ उडली आहे.

Thane rape
Thane rape
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 18, 2024, 7:34 PM IST

ठाणे Thane rape : 37 वर्षीय आरोपीनं 16 वर्षीय शाळकरी मुलीवर बलत्कार केल्याची घटना घडली आहे. तसंच मुलीचे अंघोळ करतानाचे फोटो पसरवून तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊन त्यानं बलात्कार केलाय.

  • आरोपीची आत्महत्या : खळबळजनक बाब म्हणजे आरोपींवर गुन्हा दाखल होताच त्यानंही मित्राच्या घरी जाऊन आत्महत्या केली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी आत्महत्या करणाऱ्या 37 वर्षीय आरोपीवर बलात्कारासह विविध कलमानुसार, पोक्सो कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वारंवार बलात्कार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित शाळकरी मुलगी मुरबाड तालुक्यातील एका गावात कुटूंबासह राहते. तसंच ती गावातील शाळेतच दहावी वर्गात शिक्षण घेत आहे. दुसरीकडं 37 वर्षीय आरोपीचा विवाह झाला असून पत्नी त्याला सोडून गेली आहे. जानेवारी 2024 मध्ये आरोपीची वाईट नजर ही शाळकरी मुलीवर पडली होती. त्यातच आरोपीनं पीडित मुलीच्या घरच्या मागे असलेल्या बाथरूममध्ये 'ती' अंघोळ करतानाचे फोटो मोबाइलमध्ये चित्रित केले होते. त्यानंतर तेच फोटो पीडित मुलीला दाखवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसंच कुटुंबालाही मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बाथरूममध्येच 18 जानेवारी 2024 ते 15 फेब्रुवारी 2024 पर्यत वारंवार बलात्कार केला.

पोलिसांनी पीडितेला ठेवलं बसवून : आरोपीच्या वाढत्या अत्याचारामुळं पीडित मुलीला त्रास असहाय्य होत असल्यानं ती भयभीत होऊन वावरत होती. त्यामुळं पीडतेच्या आईनं तिच्याकडं अधिक चौकशी केली असता, तिच्यावर घडत असेलला धक्कादायक प्रकार तिनं आईला सांगितला. त्यानंतर 9 फ्रेबुवारी 2024 रोजी पीडित मुलीला घेऊन तिच्या आईनं मुरबाड पोलीस ठाणे गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या दिवशी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा न दाखल करता पीडित मुलीसह तिच्या आईला पोलीस ठाण्यात दिवसभर बसून ठेवलं, असा आरोप पीडित मुलीनं केला. त्याबाबत मुरबाड शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चंदने यांच्याकडं तसं लेखी पत्र दिलं. त्या पत्रानुसार रवींद्र चंदने यांनी त्या दिवशी पोलीस ठाण्यात हजर असलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीसाठी लेखी तक्रार दिली आहे.

आरोपीची आत्महत्या : घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी शाळकरी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून 37 वर्षीय आरोपीवर भादंवि कलम 376,(2)(एन ), 376(3), 354(ए ) 354,( सी ), 341, 504, 506, सह पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीनं दुसऱ्या गावात राहणाऱ्या एका मित्राच्या घरी जाऊन आत्महत्या केल्याची माहितीही तपास अधिकारी बाबर यांनी दिली आहे. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हे वाचलंत का :

  1. लिव्ह-इन पार्टनरला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
  2. सराईत मोटारसायकल चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; 10 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त
  3. रायगड जिल्ह्यातील तीन मांडूळ तस्करांना साताऱ्यात अटक, 1 कोटी रुपये किंमतीचे मांडूळ जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.