ETV Bharat / state

शाळेच्या आवारातील पानटपऱ्यांवर कारवाई करा, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची मागणी - Tobacco Action - TOBACCO ACTION

Tobacco Action : शाळेच्या परिसरातील 100 मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह (Sushiben Shah) यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याकडं केली आहे.

maharashtra state commission for protection
राज्य बालहक्क संरक्षण आयोग (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 12, 2024, 10:24 PM IST

मुंबई Tobacco Action : शाळेच्या परिसरातील १०० मीटर अंतरावर असणाऱ्या पानटपऱ्यांवर बंदी आहे. तरीही राज्यात शाळेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सर्रासपणे केली जात आहे. त्यामुळं शाळकरी मुले व्यसनांच्या आहारी जात आहेत. ही बाब अतिशय गंभीर असून सरकारनं शाळा परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवरील बंदीची कठोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शाह (Sushiben Shah) यांनी केलीय. याबाबत त्यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) आणि पोलीस महानिरिक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई) दीपक कुमार पांडे यांच्याकडं पत्राद्वारे केलीय.

शाळकरी मुले व्यसनाच्या आहारी : काही दिवसांतच मुंबईसह राज्यातील सर्वच शाळा सुरू होत आहेत. मुंबईत अनेक शाळा नागरी वस्तीच्या परिसरात आहेत. तसेच बहुतांश ठिकाणी शाळा, बाजार, दुकानांनी वेढलेल्या आहेत. या दुकानांमध्ये, स्टॉलमध्ये काही ठिकाणी तंबाखू, गुटखा, मावा, पान असे पदार्थ सर्रासपणे विकले जातात. विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होऊन ते व्यसनाच्या आहारी जात आहेत. शाळकरी मुले तंबाखू, गुटख्याच्या आहारी जातात. विद्यार्थांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रशासनानं प्रयत्न करावे, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी केलीय.

पुण्यातील घटनेने गांभीर्य वाढले : १९ मे च्या रात्री पुण्यातल्या कल्याणी नगर परिसरात एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवत होता. हा मुलगा अवघ्या १७ वर्षांचा होता. त्याने एका बाईकला धडक दिली, दुर्दैवाने या घटनेत बाईकवरील दोघांनाही जीव गमवावा लागला. यासारख्या प्रकारांना आळा बसण्यासाठी शाळा परिसरातील तंबाखूजन्य पदार्थांच्या आणि मद्य विक्रीवरील बंदीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ॲड. सुशीबेन शाह यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पोलीस महानिरिक्षक (महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई) दीपक कुमार पांडे यांच्याकडं पत्राद्वारे केली आहे.

शाळेचा परिसर तंबाखूमुक्त ठेवा : युवकांना तंबाखूच्या भीषण परिणामांची माहिती होणं गरजेचं आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त ठेवावा. १०० यार्डांच्या आत अशा पदार्थांची विक्री न करण्याविषयी कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची देखील असल्याचं त्या म्हणाल्या.

हेही वाचा -

  1. धारावी डायरी: जगण्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या वस्तूंपेक्षा, तंबाखू मिळवण्यासाठी तलफगारांची घालमेल
  2. Gutkha Seized In Bhiwandi: भिवंडीत रहिवासी इमारती ठरताहेत गुटखा तस्करांचा अड्डा, पाच लाखांचा गुटखा जप्त
  3. WHO Steps Survey : मुंबईकरांनो 'या' सर्व्हेची दखल घ्या, अन्यथा भोगावे लागणार गंभीर परिणाम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.