ETV Bharat / state

गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळ सज्ज; 4300 जादा गाड्या सोडणार - ST Mahamandal

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 9:52 PM IST

ST Mahamandal : 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या काळात कोकणातील चाकरमान्यांना सण साजरा करण्यासाठी गावी जाता यावे, याकरता एसटी महामंडळानं 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत राज्यभरात 4300 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा बातमी...

ST Mahamandal
एसटी महामंडळ बस (File Photo)

मुंबई ST Mahamandal : कोकणवासीयांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. 7 सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी मुंबईतील कोकणी नागरिक रेल्वेबरोबरच एसटीकडे आस लावून होते. एसटी प्रशासनाने देखील त्यांच्या अपेक्षांना खरे उतरत 2 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत 4300 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे.

गट आरक्षणात देखील सवलत मिळणार : विशेष महत्त्वाची बाब म्हणजे, जादा गाड्यांचे आरक्षण करताना गट आरक्षण करतानासुध्दा एसटी प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक, महिला यांना देय असलेली सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरक्षणामध्ये नेहमीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. व्यक्तिगत आरक्षण करताना ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के सवलत तर महिला, भगिनींना 50 टक्के सवलत तिकीट दरांमध्ये दिली जाते. त्याचप्रमाणे यंदा गट आरक्षण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के तर महिलांना 50 टक्के तिकीट दरात सवलत दिली जात आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत 800 जास्त गाड्यांचे आरक्षण झाल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी अभिजीत भोसले यांनी दिली. मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर अशा विविध ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कोकणी बांधव मोठ्या संख्येनं वास्तव्य करतात त्या ठिकाणांहून या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. कोकणात जाणाऱ्या भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे.

आरक्षण कसं करायचं : या बस गाड्यांच्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आरक्षण करता येईल, असं एसटी महामंडळातर्फे सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय प्रत्यक्ष एसटी स्थानकात जाऊन किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲप वरून देखील प्रवासी आरक्षण करू शकतील.

वाहतूक सुरळीत होण्यासाठी कर्मचारी, अधिकारी तत्पर : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या एसटीची वाहतूक सुरळीतपणे व्हावी यासाठी एसटीच्या बस स्थानकांवर आणि बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र तत्पर राहणार आहेत. बस नादुरुस्त झाल्यास तातडीने बस दुरुस्त करण्यासाठी महामार्गावर विविध ठिकाणी वाहन दुरुस्ती पथक उपलब्ध असेल. लांबचा प्रवास असल्याने प्रवाशांना अडचण होऊ नये यासाठी नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृहं उभारण्यात येणार आहेत. एसटी, कोकण आणि गणपती यांचे अनोखे नाते आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात देखील हे नाते अधिक वृध्दींगत करण्याचा प्रयत्न एसटी प्रशासनाकडून केला जात आहे.

हेही वाचा:

  1. मुख्यमंत्र्यांची एक सही नसल्यानं प्रवाशांचे होणार हाल; 'लालपरी'च्या नवीन गाड्यांना विलंब - ST Corporation bus procurement
  2. अमरावतीत शिवमहापुराण कथेसाठी भाविकांची गर्दी; एसटी महामंडळ झालं मालामाल
  3. Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात गाड्या सोडल्याने स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी; पहा व्हिडीओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.