ETV Bharat / state

राज्यातील पाच गडकिल्ल्यांवरील मातीतून साकारली शिवरायांची मूर्ती; किल्ले संवर्धित ठेवण्याचा दिला संदेश - CHHATRAPATI SHIVAJI MAHARA

Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज राज्यासह देशभरात अनेक उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. कोल्हापुरातील एका कलाशिक्षकानं राज्यातील पाच किल्ल्यांवरील माती एकत्र करुन शिवरायांची मूर्ती साकारलीय. ही मूर्ती पाहण्यासाठी परिसरातील शिवप्रेमींनी गर्दी केलीय.

Shiv Jayanti 2024
Shiv Jayanti 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 19, 2024, 2:57 PM IST

Updated : Feb 19, 2024, 3:12 PM IST

राज्यातील पाच गडकिल्ल्यांवरील मातीतून कलाशिक्षकानं साकारली शिवरायांची मूर्ती

कोल्हापूर Shiv Jayanti 2024 : छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोल्हापुरातील कलाशिक्षकानं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या पाच गडकिल्ल्यांवरची माती आणि पाणी एकत्र करून शिवरायांची हुबेहूब मूर्ती साकारलीय. छत्रपती शिवरायांचे जिवंत स्मारक असलेले गडकिल्ले संवर्धित व्हावेत, अशी यामागची संकल्पना असल्याचं कलाशिक्षकानं स्पष्ट केलंय. सतीश वडणगेकर असं या कलाशिक्षकाचं नावं आहे.

काय आहे संकल्पना : छत्रपती शिवरायांनी स्वराज्य रक्षणासाठी बांधलेल्या राज्यातील अनेक गडकिल्ल्यांवर कलाशिक्षक सतीश वडणगेकर यांनी पदभ्रमंती केलीय. मात्र जीर्ण झालेले गडकिल्ले संवर्धित व्हावेत, या अपेक्षेनं त्यांना राज्यातील रायगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, पन्हाळा आणि भुदरगड या किल्ल्यांवरील माती एकत्रित करुन शिवरायांचं शिल्प साकारण्याची कल्पना सूचली.

पडझड होणाऱ्या किल्ल्यांची माती-पाणी वाचावं- गेली दोन महिने त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत केलेल्या अथक प्रयत्नातून साकारलेलं हे शिल्प शिवजयंतीदिनी लोकांसाठी खुलं केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं कृषी क्षेत्रासाठी बहुमूल्य योगदान आहे. माती आणि पाणी त्यातील बहुमूल्य घटक आहेत. यामुळं पडझड होणाऱ्या किल्ल्यांची माती आणि पाणी वाचलं पाहिजे, हा हेतू डोळ्यासमोर ठेवून वडणगेकर यांनी पाच गडकोटांवरील माती एकत्र जमवली. स्वतः शिल्पकला शिक्षक असल्यानं आणलेल्या मातीतूनच हे शिल्प साकारण्याचं कसब वडणगेकर यांनी जपलं. अन्य कोणत्याही मातीचं मिश्रण न करता गडकिल्ल्यांवरील माती आणि पाण्यातून हुबेहूब शिवरायांची मूर्ती साकारलीय. ही मूर्ती पाहण्यासाठी कोल्हापुरातल्या कुंभार गल्लीत शिवप्रेमींनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय.

नव्या पिढीला शिल्प आणि चित्रकलेचं प्रशिक्षण मोफत : कोल्हापूरचे ज्येष्ठ चित्रकार स्वर्गीय दिनकर विठ्ठल वडणगेकर यांच्या स्मरणार्थ दि. वि. फाउंडेशन सुरु करून नव्या पिढीला प्रशिक्षित करण्याचं काम सतीश वडणगेकर करत आहे. सध्या 20 मुला-मुलींना शिल्पकला आणि चित्रकलेचं मोफत प्रशिक्षण वर्ग वडणगेकर यांनी सुरु केले आहेत. नव्या पिढीपर्यंत कला पोहोचावी, या उद्देशानं सतीश वडणगेकर सध्या कार्यरत आहेत. वडणगेकर यांची तिसरी पिढी चित्रकलेचा वारसा समर्थपणे चालवत आहेत.

हेही वाचा :

  1. दोन वर्षानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद; राजापेठ उड्डाणपुलावर पोलिसांचा बंदोबस्त
  2. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते विविध लढाईंचं शिवनेरीवर सादरीकरण; पाहा व्हिडिओ

Last Updated : Feb 19, 2024, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.