हैदराबाद NASA Parker Solar Probe : नासाच्या पार्कर सोलर प्रोबनं सूर्याच्या सर्वात जवळ पोहोचण्याचा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. अमेरिकन अंतराळ संस्थेनं सांगितलं की, हे अंतराळयान 24 डिसेंबर रोजी सूर्याजवळ 3.8 दशलक्ष मैल (6.1 दशलक्ष किलोमीटर) अंतरावर पोहचलं होतं. या दरम्यान, हे अंतराळयान पूर्णपणे सुरक्षित आणि सामान्य स्थितीत आहे. हे अभियान सूर्याचे रहस्य उलगडण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे.
सूर्याजवळून पाठवला सुरक्षित सिग्नल : या ऐतिहासिक कामगिरीनंतर, या अंतराळयानानं गुरुवारी रात्री उशिरा सिग्नल पाठवलाय, ज्यामुळं ते सुरक्षित असल्याची खात्री झालीय. जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरी, मेरीलँड येथील टीमला हा सिग्नल मिळाला. नासानं म्हटले आहे की सूर्याजवळून जाताना या यानानं 4,30,000 मैल प्रतितास (6,92,000 किमी/तास) वेग आणि 1,800 अंश फॅरेनहाइट (982 अंश सेल्सिअस) तापमान सहन केलं.
शास्त्रज्ञांना मिळेल नवीन माहिती : पार्कर सोलर प्रोब 1 जानेवारी रोजी त्याच्या विक्रमी प्रवासाचा तपशीलवार डेटा पाठवणार आहे. शास्त्रज्ञांना आशा आहे की या मोहिमेमुळं सौर पदार्थाचे अति तापणे, सौर वाऱ्याची उत्पत्ती आणि प्रकाशाच्या वेगाने पोहोचणारे ऊर्जावान कण यांचं रहस्य उलगडेल.
याबाबत मिशन मॅनेजर निक पिंकनी म्हणाले, "आतापर्यंत कोणतेही मानवनिर्मित अंतराळयान सुर्याच्या इतक्या जवळ पोहोचलेलं नाही. हे अंतराळयान 'अस्पृश्य क्षेत्रातून' महत्त्वाचा डेटा आणत आहे. 2018मध्ये सुरू झालेल्या या मोहिमेनं शुक्र ग्रहाजवळून उड्डाण करताना सूर्याच्या जवळच्या कक्षेत प्रवेश केला. 2021 मध्ये, त्यानं सूर्याच्या वातावरण आणि कोरोनाशी संबंधित नवीन माहिती दिली".
सूर्य आणि सूर्यमालेच्या रहस्यांकडं पाऊल : नासाच्या अधिकारी निक्की फॉक्स यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केलाय.पार्कर सोलर प्रोबनं सूर्याच्या अभ्यासासाठी नवीन आयाम उघडले आहेत. या मोहिमेमुळं शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागाच्या अभ्यासातही नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. सूर्य आणि सूर्यमालेचे रहस्य समजून घेण्यात शास्त्रज्ञ ही एक मोठी कामगिरी मानतात.
हे वाचलंत का :