शिर्डी Sai Baba Temple Security : साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या दक्षिणेतील वेगवेगळ्या चार भाविकांचे विसरुन गेलेले आणि हरवलेले तसंच चोरीस गेलेल्या सोन्यासह रोख रक्कम साईबाबा संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी भाविकांना प्रामाणिकपणे परत केल्यानं कौतुक करण्यात येतंय. तर दुसरीकडे संस्थानच्या सुरक्षारक्षकांवर ताशेरे ओढणाऱ्या लोकांना एक चपकार बसलीय.
चोरीस गेलेले 30 हजार सुरक्षा रक्षकांनामुळे भाविकाला मिळाले परत : तेलंगणा राज्यातील एक साईभक्त कुटुंब 31 मार्च रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. साईबाबांचं दर्शन घेऊन मंदिराबाहेर आल्यानंतर पर्स चोरीला गेल्याचं त्यांच्या लक्षात आलंय. यानंतर भाविकांनी साईबाबा संस्थानच्या सुरक्षा विभागात जाऊन पर्स चोरी गेल्याची तक्रार दिली. त्यानंतर संस्थानच्या सुरक्षारक्षकांनी यंत्रणा हलवत भाविकाची पर्स चोरणाऱ्या आरोपींना काही तासांतच सीसीटीव्हीच्या माध्यमातून ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान ताब्यात घेतलेल्या चोरांकडे भाविकाची पर्स मिळून आली. तीस हजार रुपायांचा मुद्देमाल हस्तगत करुन भाविकांना परत मिळवून दिलाय. तर चोरांना शिर्डी पोलिसांनाच्या ताब्यात देण्यात आले. भाविकाला आपली पर्स परत मिळल्यानं भाविकांनी संस्थानच्या सुरक्षाराक्षकांचं कौतुक केलंय.
हरवलेलं सोन्यासह 50 हजारांची रोख रक्कम भाविकाला परत केली : तामिळनाडूतील वेल्लोर येथील विजयकुमार या साईभक्ताचे 2 एप्रिल रोजी साईबाबांच्या मंदिराच्या प्रवेशद्वारा समोर पैशानं भरलेलं पाकीट व सात ग्राम वजनाचे सोन्याचे झुबे असा एकूण 50 हजार रुपयांचा मुद्देमाल साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षक सुदाम तुकाराम भानगुडे यांना सापडला. त्यांनी हे प्रामाणिकपणे संरक्षण ऑफीसला नेऊन जमा केले. त्यानंतर भाविकाशी संपर्क साधून पैसे व दागिने परत करण्यात आले.
- विसरुन राहिलेलं 1 लाख 34 हजारांचं सोनं भाविकाला परत : आंध्र प्रदेशातील महिला साईभक्ताची दोन तोळ्याची सोन्याची बांगडी भक्त निवासात विसरुन राहिली होती. ती शोधून साईबाबा संस्थानचे सुरक्षा रक्षक प्रविण भागवत यांनी भाविकाला परत केली. त्यांच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक होतंय. साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षकांवर कायम कुठल्या ना कुठल्या कारणास्तव काही लोक टीका करत असतात. मात्र साईबाबा संस्थानचे सुरक्षा कर्मचारी प्रामाणिकपणानं काम करत आहेत. साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची प्रामाणिकपणे सुरक्षेची काळजी घेत असल्याचं दिसून आले.
हेही वाचा :