ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांचं फडतूस राजकारण; एनडीएच्या खासदारांबाबत संजय राऊतांचा मोठा दावा - Sanjay Raut On Devendra Fadnavis - SANJAY RAUT ON DEVENDRA FADNAVIS

Sanjay Raut On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीला या निकालात मोठं यश मिळालं. त्यामुळे या निकालावरुन उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

Sanjay Raut On Devendra Fadnavis
खासदार संजय राऊत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 10:41 AM IST

Updated : Jun 6, 2024, 11:38 AM IST

नवी दिल्ली Sanjay Raut On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुडाचं राजकारण केलं. त्यांच्या या फडतूस राजकारणामुळे जनतेनं त्यांना घरी बसवलं, असा हल्लाबोल उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. एनडीएमधील अनेक खासदार नाराज असून आमच्या संपर्कात आहेत, अशी माहितीही संजय राऊत यांनी केली. लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर दिल्लीत झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस यांचं फडतूस राजकारण : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये महाविकास आघाडीला मोठं घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये उत्साह संचारला आहे. लोकसभा निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपा नेत्यांवर चांलंच तोंडसूख घेतलं आहे. "राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुडाचं राजकारण केलं. त्यांनी अनेकांना धमक्या देणं, लोकांना पाडणं, पक्ष फोडणं असं फडतूस राजकारण केलं. त्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. विदर्भात तर त्यांच्या या राजकारणाला कंटाळून लोकांनी त्यांना घरी बसवलं," असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

पंतप्रधान मोदींच्या विरोधात जनभावना : लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये भाजपाला मोठा धक्का बसला. यावरुन आता भाजपाचे राज्यातील नेतृत्व करणारे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीकेची झोड उठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात जनभावना आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये भाजपाची पिछेहाट झाल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. राजकारणातील 'तेल लावलेला पैलवान' कोणता टाकणार डाव ? निवडणुकीनंतर शरद पवारांच्या धक्कातंत्राची विरोधकांना धास्ती - Lok Sabha Election Result 2024
  2. "मोदींना शपथ घेऊ द्या, त्यांच्यासाठी आम्ही मिठाई वाटू"-संजय राऊत - Sanjay Raut News
  3. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड, 16 पक्षांचे 21 नेते बैठकीला हजर; राष्ट्रपतींनी लोकसभा केली विसर्जित - NDA Leaders Meeting

Last Updated : Jun 6, 2024, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.