ETV Bharat / state

सलमान खानवर हल्ला करण्याच्या कटातील आरोपीला हरियाणातून अटक, नवी मुंबई पोलिसांची कारवाई - SALMAN KHAN NEWS - SALMAN KHAN NEWS

अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या पाचव्या आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली. या आरोपीला हरियाणामधील भिवानी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीला पनवेलला आणून त्याची चौकशी केली जाणार आहे.

Salman Khan house firing case
Salman Khan house firing case (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 8:59 AM IST

ठाणे- अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याचा कट नवी मुंबई पोलिसांनी उधळून लावला. या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी हरियाणा येथून आरोपीला अटक केली. सलमान खानवर हल्ला करण्याच्या कटातील आरोपींची संख्या पाच झाली आहे. अटकेतील आरोपी हा लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार गँगचा कथित सदस्य असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

अभिनेता सलमान खानवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या चार जणांना यापूर्वी पनवेल पोलिसांनी अटक केली. नवी मुंबई पोलिसाच्या माहितीनुसार दीपक हवासिंग गोगलिया उर्फ जॉनी वाल्मिकी ( ३०) याला शनिवारी हरियाणातील भिवानी येथून अटक करण्यात आली. त्यानं सलमानवर हल्ला करण्याचा कटर रचणाऱ्या आरोपींच्या राहण्याची व्यवस्था केली होती. तसेच त्यांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. गोगलिया हा व्हिडिओ कॉलद्वारे इतर आरोपींच्या संपर्कात राहून त्यांना मदत करत होता.

आरोपीला पनवेलला आणण्यात येणार-पनवेलचे पोलीस उपायुक्त (झोन 11), विवेक पानसरे म्हणाले, " आरोपीच्या अटकेसाठी भिवानी जिल्ह्याचे एसपी वरुण सिंघला यांची मदत घेण्यात आली. नवी मुंबईतील गुन्हे शाखेचे पथकानं भिवानीत जाऊन आरोपीला अटक केली. आरोपी गोगलियाला रविवारी भिवानी येथील न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकाऱ्यांनी नवी मुंबई पोलिसांची ५ जूनपर्यंत ट्रान्झिट रिमांड मंजूर केली. त्यानंतर आरोपीला पनवेलला आणण्यात येणार आहे."

आतापर्यंत काय घडले- सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दोन दुचाकीस्वारांनी 14 एप्रिलला गोळीबार केला. तेव्हापासून पोलिसांच्या रडारवर बिश्नोई गँगमधील गुंड आले आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या विकी गुप्ता आणि सागल पाल या शूटरला गुजरातमधून अटक केली. तर त्यांचे सहकारी सोनू बिश्नोई आणि अनुज थापन यांना पंजाबमधून अटक केली. आरोपी थापनने १ मे रोजी पॉलीस लॉकअपमध्ये कथित आत्महत्या केली. लॉरेन्सच्या टोळीतील चार आरोपींनी सलमान खानचे पनवेल येथील फार्महाऊस, मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या घराच्या आसपासचा परिसर आणि चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी भेट दिली होती. पोलिसांनी एप्रिलमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई यांच्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल केला.

लॉरेन्स बिश्नोईकडून सलमानला सतत जीवे मारण्याच्या धमक्या- लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. तर त्याचा सहकारी अनमोल बिश्नोई अमेरिका किंवा कॅनडात राहून टोळीची सूत्रे चालवितो. सलमान खाननं काळविटची कथित शिकार केल्यानंतर लॉरेन्स गँगकडून सातत्यानं अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.

हेही वाचा-

  1. पनवेल फार्महाऊसबाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी सलमान खानच्या फॅनगर्लला घेतलं पोलिसांनी ताब्यात - Salman Khan fan girl
  2. सलमान खानवर हल्ल्याचा आणखी एक कट; बिश्नोई गँगच्या 4 शूटर्संना अटक, हल्ल्यासाठी मागवणार होते पाकिस्तानातून शस्त्र - Salman Khan Firing Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.