ETV Bharat / state

महायुतीच्या ऐतिहासिक विजयामागं 'आरएसएस'; गेल्या 5 महिन्यात काय घडलं? जाणून घ्या 'अंदर की बात' - RSS STRATEGY FOR MAHAYUTI

विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीनं दणदणीत विजय नोंदवला. महायुतीत एकट्या भाजपानं 132 जागा जिंकल्या.

RSS STRATEGY MAHAYUTI
देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 26, 2024, 7:51 PM IST

Updated : Nov 26, 2024, 7:56 PM IST

नागपूर : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि विशेषत: भाजपानं मिळवलेल्या यशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं योगदान आहे, असं लोक मानतात. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर भाजपा आणि संघानं अशी कोणती जादू केली, ज्यामुळं भाजपानं तब्बल 132 जागा जिंकल्या. हे समजून घेण्यासाठी आरएसएस आणि भाजपामध्ये गेल्या 5 महिन्यात काय घडलं, हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे.

"सुरुवातीला दहा वर्ष संघ परिवाराचं देवेंद्र फडणवीस यांच्यावर अजिबात नियंत्रण नव्हतं. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीस हे ज्याप्रकारे भाजपाच्या नियंत्रणात काम करत होते, त्याच प्रकारे ते आरएसएसच्या नियंत्रणात काम करू लागले. त्याचा हा निकाल आहे," असं संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी सांगितलं.

लोकसभेच्या निकालानंतर संघ ॲक्टिव्ह : "पाच महिन्यांपूर्वी म्हणजे 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यानंतर 5 जूनला देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत संपूर्ण पराभवाची जबाबदारी स्वीकारत "मी राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडतो. मला संघटनेत काम करू," द्या अशी भूमिका घेतली होती. त्यांनतर आरएसएस ॲक्टिव्ह झाला," अशी माहिती संघ अभ्यासक दिलीप देवधर यांनी दिली.

राजीनामाची घोषणा करताच आरएसएस ॲक्टिव्ह : "लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 6 जूनला आरएसएसचे सहसरकार्यवाह अतुल लिमये पदाधिकाऱ्यांसह नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. देवेंद्र फडणवीसांशी त्यांनी तासभर चर्चा केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या पदावर कायम राहतील, ते राजीनामा देऊन सरकारमधून बाहेर पडणार नाही, संघटनेची जबाबदारी स्वीकारणार नाही, असं भाजपाकडून स्पष्ट करण्यात आलं. भाजपा आणि संघात विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं समन्वयासाठी अनेक बैठका झाल्या. संघ परिवार संपूर्ण ताकदीनिशी भाजपासाठी दैनंदिन काम करत होता," असं देखील दिलीप देवधर म्हणाले.

अजित पवारांचा सरकारमध्ये समावेश का? : सुरुवातीच्या बैठकांमध्ये भाजपाला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन नेमका काय फायदा झाला? असे प्रश्न संघटनांकडून विचारण्यात आले. 23 जुलै रोजी मुंबईतील लोअर परळ भागातील प्रभादेवीमध्ये यशवंत भवनात आरएसएसचे सहसरकार्यवाह अरुण कुमार, दुसरे सहसरकार्यवाह अतुल लिमये यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर संघ पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांचा सरकारमध्ये समावेश का करण्यात आला? यावर चर्चा झाली. या सर्व घडामोडी वेगात घडत असताना त्याच रात्री अजित पवार दिल्लीला रवाना झाले होते.

अजित पवारांबद्दल सूर मवाळ झाला : 23 जुलैच्या मुंबई आणि दिल्लीतील बैठकीतून आरएसएसचा अजित पवार यांच्या संदर्भात असलेला नाराजीचा सूर मवाळ करण्यात भाजपाला यश आलं. प्रसार माध्यमांमध्ये देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील, ते महाराष्ट्रात राहणार नाहीत. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं जाईल, अशा बातम्या सुरू झाल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे प्रसार माध्यमांसमोर स्पष्ट केलं होतं की, ते राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाहीत. आपण महाराष्ट्राच्याच राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस आणि अतुल लिमये यांच्यात बैठक : देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं विधान केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी नागपुरात संघ कार्यालयात देवेंद्र फडणवीस आणि सहसरकार्यवाह अतुल लिमये यांची पुन्हा बैठक झाली. त्यात देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महाराष्ट्रातच राहील आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात भाजपाचं नेतृत्व करतील, हे स्पष्ट झालं.

संघ आणि भाजपात बैठक : 9 ऑगस्ट रोजी नागपूरच्या एका शाळेत संघ परिवारातील सर्व संघटनांची समन्वय बैठक पार पडली. आरएसएस कुटुंबाचा एक भाग म्हणून भाजपाला बोलावण्यात आलं होतं. भाजपाच्या वतीनं देवेंद्र फडणवीस या बैठकीत सहभागी झाले. त्यांनी 40 ते 45 मिनिट भाषण देत भाजपाची संपूर्ण भूमिका मांडली. राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपासमोर काय अडचणी आहेत? लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह भाजपाच्या पराभवासाठी कसा कारणीभूत ठरला? यासह जे मुद्दे अडचणीचे ठरतायत त्या सर्व मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

हरियाणामधील 'मायक्रो प्लानिंग' महाराष्ट्रात : महाराष्ट्रात निवडणुका जाहीर होण्यापूर्वी म्हणजे हरियाणात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आरएसएस आणि भाजपाची समन्वय बैठक पार पडली. हरियाणामधील संघ आणि भाजपाचं 'मायक्रो प्लानिंग' महाराष्ट्रात कसा अंमलात आणायचं याबद्दल त्या बैठकीत चर्चा झाली होती.

एकूणच या सगळ्या घटना पाहता संघाच्या लोकांच्या माध्यमातून भाजपाला प्रत्यक्ष नाही तर नेहमीच अप्रत्यक्ष मदत करण्यात येते असंही देवधर यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. "हे बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल"; जितेंद्र आव्हाडांनी 'त्या' 12 आमदारांची लिस्ट केली शेयर
  2. अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात? विखे पाटील यांच्यासह राजळे, जगताप, लंघे, खताळ, काळे मंत्रिपदाच्या रेसमध्ये
  3. 2014 नंतर भारतात बॉम्बस्फोट घडवण्याची कुणाची हिंमत नाही, देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं

Last Updated : Nov 26, 2024, 7:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.