ETV Bharat / state

शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तरी दरोडेखोरांनी कुटुंबाला शस्त्राच्या धाकावर लुटलं - ROBBERS ROBBED FAMILY AT GUNPOINT

नागपुरात विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सुरू असून शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे. मात्र तरीही दरोडेखोरांनी एका कुटुंबाला शस्त्राच्या धाकावर बंदिस्त करुन लाखोची लूट केली.

Robbers Robbed Family At Gunpoint
दरोडेखोरांनी लुटलेलं घर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 19, 2024, 12:59 PM IST

नागपूर : दरोडेखोरांनी एकाचं कुटुंबातील पाच सदस्यांना बंधक बनवून लाखोंची नगदी आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील खसाला भागात ही घटना घडली आहे. तोंड झाकून आलेल्या दरोडेखोरांनी धारदार शस्त्राच्या धाकावर संपूर्ण कुटुंबाला बंधक बनवून लाखो रुपयांची लूट केली. ही घटना बुधवारी रात्री 2.30 वाजताच्या सुमारास घडली आहे. राजेश पांडे असं लुटण्यात आलेल्या कुटुंबप्रमुखाचं नाव असून ते एका कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

खिडकीची लोखंडी ग्रील तोडून घुसले दरोडेखोर : राजेश पांडे हे एका ट्रान्सपोर्ट कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. आपल्या कुटुंबासोबत ते खसाला टोली प्लॉट नंबर 38 इथं राहतात. रात्री अडीच वाजताच्या सुमारास दरोडेखोरांनी घराच्या सुरक्षा भिंतीवरून घराच्या पहिल्या मजल्यावर प्रवेश केला. त्यावेळी पांडे कुटुंबीय गाढ झोपेत होते. खिडकीची लोखंडी ग्रील तोडून आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत राजेश पांडे यांची पत्नी, त्यांच्या मुलीला बंधक बनवलं. आरोपींनी घरातील पाच लाख रुपयांची नगदी आणि सोन्याचे दागिने लंपास केले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आरोपींनी तक्रारदांना गाडीत डांबून नेलं : आरोपींनी राजेश पांडे यांना आपल्या स्कार्पिओ गाडीतून घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी त्यांना रिंग रोडवर सोडून पोबारा केला आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपींची स्कार्पिओ गाडी बेवारस परिस्थितीत माजरी परिसरात मिळून आली आहे. यादरम्यान आरोपींनी घरातील सर्व 6 मोबाईल फोन देखील आपल्या सोबत नेले. बेवारस परिस्थितीत आढळल्या स्कार्पिओ मध्ये ते सर्व सहा फोन आढळून आले आहेत पोलिसांनी सर्व फोन जप्त केले असून तपास सुरू केला आहे

पुरावे नष्ट करण्यासाठी DVR नेला : दरोडेखोरांनी जाता-जाता घरात लागलेल्या CCTV कॅमेऱ्याचा DVR देखील आपल्या सोबत घेऊन नेला आहे. टीपच्या आधारावर ही घटना केली अशी चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून काही संशयितांनाही ताब्यात घेतलं जात आहे

हेही वाचा :

  1. पोलिसांचे पेट्रोलिंग सुरू असताना ७ लाख ९३ हजार रुपयांची रोकड जप्त, पहा व्हिडिओ
  2. नागपुरात पोलिसांनी जप्त केली १ कोटी ३५ लाखांची रोकड, दुचाकीस्वाराला घेतलं ताब्यात
  3. नागपुरातील हॉटेलमध्ये तरुणीचा संश्यास्पद मृत्यू; मित्राचा शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.