ETV Bharat / state

रतन टाटांपासून मनोहर जोशींपर्यंत वर्ष 2024 मध्ये 'या' व्यक्तिमत्त्वांनी गमावलं आयुष्य - YEAR ENDER 2024

समाजात एक विशेष स्थान असलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी रतन टाटांपासून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींपर्यंत अनेकांचं निधन झालंय. त्यामुळे महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झालीय.

personalities lost their lives in the year 2024
वर्ष 2024 मध्ये या व्यक्तिमत्त्वांनी गमावलं आयुष्य (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 13, 2024, 6:52 PM IST

मुंबई - भारतात अन् परदेशात असे अनेक महान व्यक्तिमत्त्वं होऊन गेलीत, ज्यांचे विचार केवळ वाचून आपले जीवन बदलून जाते. जीवनात जेव्हा आपल्याला काहीच समजत नाही तेव्हा या महापुरुषांचे विचारच आपल्याला मार्गदर्शन करतात. 2024 या वर्षातही अशाच काही महान व्यक्तिमत्त्वांचं निधन झालंय. विशेष म्हणजे नवीन वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. परंतु वर्षभरात महाराष्ट्रानं नावलौकिक मिळवलेले अन् प्रतिष्ठित अनेक व्यक्तिमत्त्वं गमावलीत. समाजात एक विशेष स्थान असलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी रतन टाटांपासून माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींपर्यंत अनेकांचं निधन झालंय. त्यामुळे महाराष्ट्राची कधीही भरून न निघणारी हानी झालीय. त्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

  • सियाराम बाबा _11 डिसेंबर 2024: जगप्रसिद्ध संत सियाराम बाबा यांचे वयाच्या 110 व्या वर्षी 11 डिसेंबर 2024 रोजी मोक्षदा एकादशीच्या दिवशी सकाळी निधन झालंय. बाबांचे अनुयायी म्हणतात की, त्यांचा जन्म महाराष्ट्रातील मुंबईच्या आसपासच्या ग्रामीण भागात झाला होता. त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व होते. याशिवाय त्यांना संस्कृतचीही जाण होती.
  • मधुकर पिचड_06 डिसेंबर 2024: महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. मधुकर काशिनाथ पिचड हे राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या काळातील महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री होते.
  • मधुकर नेराळे_29 नोव्हेंबर 2024: महाराष्ट्रातील तमाशासह लोककलांचे प्रणेते आणि लोककलांमध्ये भीष्माचार्य अशी प्रतिमा निर्माण करणारे मधुकर नेराळे यांचे हृदयविकाराने निधन झालंय. ते 81 वर्षांचे होते.
  • मुकुंद फणसाळकर_19 नोव्हेंबर 2024: 'नक्षत्राचे देणे' फेम प्रसिद्ध गायक मुकुंद फणसाळकर यांचं निधन झालंय. अनेक दशके आपल्या आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या मुकुंद फणसाळकर यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतलाय.
  • रोहिणी गोडबोले_25 ऑक्टोबर 2024: प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि विज्ञानातील स्त्रियांच्या पुरस्कर्त्या रोहिणी गोडबोले यांचं 71 व्या वर्षी निधन झालंय. रोहिणी गोडबोले या भारतातील विज्ञानात महिलांसाठी समान संधींचा पुरस्कार करणाऱ्या प्रमुख आवाजांपैकी एक होत्या.
  • वसंत अनंत गाडगीळ_18 ऑक्टोबर 2024: संस्कृतचे अभ्यासक आणि शारदा ज्ञानपीठाचे संस्थापक वसंत अनंत गाडगीळ यांचे पुण्यात निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात संस्कृतचे शिक्षण घेतलेल्या गाडगीळ यांनी पुण्यात शारदा ध्यान पीठाची स्थापना केली आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी अमेरिका आणि आफ्रिकेसारख्या ठिकाणी प्रवास केला. वेद आणि उपनिषद यांसारखे प्राचीन संस्कृत ग्रंथ त्यांनी आत्मसाद केले. गाडगीळ हे यापूर्वी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेशी संबंधित होते.
  • अतुल परचुरे 14 ऑक्टोबर 2024: ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे वयाच्या 57 व्या वर्षी निधन झालंय. कॅन्सरशी लढा देऊन त्यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. अतुल परचुरे यांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि रंगमंचावर काम केलंय. ते प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध होते.
  • बाबा सिद्दिकी_12 ऑक्टोबर 2024: बाबा सिद्दिकी यांच्यावर 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. बाबा झियाउद्दीन सिद्दिकी हे राजकारणी होते, जे वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेचे आमदारसुद्धा झाले होते.
  • रतन टाटा_9 ऑक्टोबर 2024: उद्योगजगतातील दिग्गज राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व असलेल्या रतन टाटांनी वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतलाय. रतन नवल टाटा यांचा रक्तदाब अचानक कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचं निधन झालंय.
  • सुहासिनी देशपांडे_26 ऑगस्ट 2024: ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं 26 ऑगस्ट 2024 रोजी निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
  • विजय कदम_10 ऑगस्ट 2024: ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचं 10 ऑगस्ट रोजी निधन झालं. गेल्या दीड वर्षांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते. अनेक चित्रपट, नाटके, मालिकांमधून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला. विजय कदम यांनी नाट्यक्षेत्रातही दर्जेदार काम केलंय. मराठी रंगभूमीसाठी सातत्याने काम करणाऱ्या आणि विविध कारणांसाठी पुढाकार घेऊन नाटक आणि नाटकाशी संबंधित लोकांसाठी काम करणाऱ्यांमध्ये विजय कदम आघाडीवर होते.
  • अंशुमन गायकवाड_ 31 जुलै 2024: माजी भारतीय क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं वयाच्या 71 व्या वर्षी कर्करोगाशी प्रदीर्घ लढाईनंतर 31 जुलै 2024 रोजी निधन झालंय.
  • अमोल काळे_10 जून 2024: मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. अमोल काळे हे भारतीय क्रिकेट प्रशासक होते. तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिले असून, नागपूर भाजपाचे माजी प्रभाग अध्यक्षही होते. अमोल काळे यांची आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टचे सदस्य म्हणून सलग तीन वेळा नियुक्ती करण्यात आली.
  • मालती जोशी_15 मे 2024: पद्मश्री लेखिका आणि कथाकार मालती जोशी यांचं बुधवारी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालंय. मालती जोशी या भारतीय कादंबरीकार, निबंधकार आणि लेखिका होत्या, ज्यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी भाषांमध्ये लेखन केले. 2018 मध्ये त्यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय.
  • मनोहर जोशी_23 फेब्रुवारी 2024: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईतील रुग्णालयात निधन झालंय. त्यांना हिंदुजा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आणि वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झालंय.
  • प्रभा अत्रे_13 जानेवारी 2024: प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आणि किराणा घराण्याच्या गायिका प्रभा अत्रे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालंय. त्यांना भारत सरकारचे तीनही पद्म पुरस्कार मिळालेत. पहाटे श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने तिचा मृत्यू झाला आणि तिला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आलंय. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झालाय.

हेही वाचा

  1. भाजपाचं हिंदुत्व केवळ मतांसाठी; बांगलादेशात हिंदू मारले जात असताना मोदी शांत कसे? उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल
  2. संसदेचं हिवाळी अधिवेशन 2024 : विरोधी पक्षातील नेत्यांनी संविधान खिशातच ठेवलं, तर भाजपानं . . . . राजनाथ सिंहांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.