ETV Bharat / state

अमरावतीत आढळली दुर्मीळ पांढरी खारुताई : गाईच्या गोठ्यात मुक्काम इतर सवंगड्यांसोबत झाडांवर मारते उड्या - White Squirrel Spotted In Amravati

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 13, 2024, 4:36 PM IST

White Squirrel Spotted In Amravati : पट्टेरी खारुताई आपण सर्रास पाहिली असेल. मात्र, अमरावती शहरात काही दिवसांपूर्वी पांढऱ्या शुभ्र रंगाची आणि लाल डोळे असलेली खारुताई आढळून आलीय. त्यामुळं ही खारुताई आता सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.

Rare White Squirrel Spotted In Amravati
अमरावतीत आढळली दुर्मीळ पांढरी खारुताई (ETV Bharat Reporter)

अमरावती White Squirrel Spotted In Amravati : सरसर झाडावर चढणारी, एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तुरूतुरू धावणारी खारुताई सर्वांना अगदी शाळेच्या दिवसांपासून परिचयाची. करडा तपकिरी रंग असणारी ही खारुताई आपण अनेकदा पाहिलीय. मात्र, अमरावती शहरात गत दोन महिन्यांपासून गाईच्या गोठ्यामध्ये चक्क पांढरी शुभ्र खारुताई बागडताना दिसतेय. पांढऱ्या रंगाची ही खारुताई लक्षवेधणारी असून या खास खारुताई संदर्भात 'ईटीव्ही भारत'चा हा स्पेशल रिपोर्ट.

दोन महिन्यांपासून दिसत आहे पांढरी खारुताई : अमरावती शहरात गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या अजय यादव यांच्या गाईच्या गोठ्यामध्ये गत दोन महिन्यांपासून पांढरी खार नियमित आढळते. ही लाल रंगाचे डोळे असणारी खारुताई गोठ्यामधील गाईच्या अंगावर चढते, तिच्यासोबत खेळते. गाईला मिळणाऱ्या अन्नातून आपलं अन्नदेखील शोधते. गोठ्यात कुणीही नसलं की सर्वसामान्य खारुताईसोबत ही पांढरी खारुताई इकडून तिकडे उड्या मारत धमाल मजा करते. गायीच्या गोठ्या लगत असणाऱ्या झाडांवर देखील तिचा अनेकदा मुक्काम असतो.

जगात खारुताईंचे 280 प्रकार : अमरावती शहरात पांढऱ्या रंगाची खारुताई ही अनेकांसाठी चर्चेचा विषय ठरली असली तरी जगात खारुताईच्या एकूण 280 प्रजाती असल्याची माहिती प्राणी आणि पक्षी मित्र यादव तरटे पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. भारतात खारुताईच्या प्रामुख्यानं 40 प्रजाती आढळतात. महाराष्ट्रात मुख्यत्वे खारुताईच्या पाच प्रजाती आहेत. महाराष्ट्रातला राज्य प्राणी शेकरू हा देखील खारीचाच प्रकार आहेत. खारुताई ही लहान किंवा मध्यम आकाराची असते. खारुताईचे मागचे पाय मजबूत असतात आणि पुढच्या दोन्ही पायांना प्रत्येकी चार बोटं तर मागील पायाला प्रत्येकी पाच बोटं असतात. तसंच तिचं शेपूट लांब आणि झुपकेदार असतं. थंडीच्या दिवसात या शेपटामुळं खारुताईला उब मिळते. खारुताईचे समोरचे दात हे देखील लक्षवेधणारेच. खारुताई ज्या भागात राहाते तिथल्या परिस्थितीशी ती जुळवून घेते.

खारुताई नेमकी पांढरी कशी : खारुताईचा रंग पांढरा हा नक्कीच कुतूहलाचा विषय आहे. अमरावतीत आढळलेली पांढऱ्या रंगाची खारुताई ही इंडियन पाल्म स्क्विरल आहे. तिच्या पाठीवर उभे पट्टे आहेत. शरीरात असणाऱ्या रंगद्रव्याच्या अभावामुळं आणि हार्मोन्स चेंजमुळं तिचा रंग पांढरा झालाय. या प्रकाराला अलबिनिझम असं म्हणतात. आपण नियमित बघतो त्या खारुताई आणि या खारुताईत कुठलाच फरक नाही. खारुताई अशी पांढऱ्या रंगाची होणं हे अतिशय दुर्मीळ असल्याची माहिती देखील यादव तरटे पाटील यांनी दिली.

नऊ वर्षांपूर्वी दिसली होती पांढरी खार : अमरावती शहरात नऊ वर्षांपूर्वी देखील पांढऱ्या रंगाची खारुताई आढळली होती. ठाणे जिल्ह्यातील गुहागरमध्ये देखील पांढरी खारुताई आढळल्याची नोंद आहे. या पांढऱ्या खारुताईचा जोडीदार देखील सामान्य खारच आहे. मीलनानंतर 30 ते 45 दिवसानंतर खारुताई तीन ते चार पिलांना जन्म देते. पिलांना जन्म देण्यापूर्वी कापूस, गवत यांच्या माध्यमातून एखाद्या बिळात किंवा झाडाच्या डोलीमध्ये ती एक खोपा तयार करते. खारुताई ही उन्हाळ्यामध्ये जमीन उखरुन त्यामध्ये अन्न साठवून ठेवते आणि हिवाळ्यात हेच अन्न जमिनीतून काढून खाते. सतत झाडांवर पळताना दिसणाऱ्या खारुताईचा वृक्ष संवर्धनामध्ये देखील महत्त्वाचा वाटा आहे, असं देखील तरटे पाटील यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. छत नसलेलं 'आनंदेश्वर' मंदिर आहे आश्चर्याचा खजिना, श्रावण सोमवारी मंदिरात भाविकांची गर्दी - Anandeshwar Mahadev Temple
  2. सावळापुरात 1861 साली सापडली 'सत्यनारायणाची मूर्ती'; दर्शनासाठी आले होते अक्कलकोटचे 'स्वामी समर्थ', जाणून घ्या मूर्तीचं रहस्य - Satyanarayan Temple
  3. गुरे चारता चारता घडला कलाकार, दगडात कोरली मूर्ती, लाकडाला दिला आकार; कलेमुळे कुटुंबालाही मिळाला आर्थिक आधार - Uttam Yewale Fine Art

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.