ETV Bharat / state

"थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला..."; राज ठाकरेंचा इशारा - Raj Thackeray Warns Theater Owners

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 2 hours ago

Raj Thackeray Warns Theater Owners : सध्या पाकिस्तानी चित्रपट 'लिजेंड ऑफ मौला जट' हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या पाकिस्तानी चित्रपटाच्या महाराष्ट्रातील प्रदर्शनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सरकार आणि थिएटर मालकांनाच वाकड्यात न जाण्याचा इशारा दिला आहे.

Raj Thackeray warns theater owners
राज ठाकरे (Source- ETV Bharat)

मुंबई Raj Thackeray Warns Theater Owners - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं चित्रपटप्रेम सर्वश्रुत आहे. जेव्हा मराठी चित्रपटांना प्रदर्शनासाठी स्क्रीन मिळत नाही, त्यावेळी राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने घेतलेली भूमिका संपूर्ण महाराष्ट्रानं वेळोवेळी पाहिलेली आहे. राज ठाकरे जितके त्यांच्या राजकारणामुळे चर्चेत असतात, अनेकदा त्याहून जास्त पाकिस्तानी चित्रपट आणि पाकिस्तानी कलाकार याबाबत केलेल्या वक्तव्यावरून चर्चेत येतात. यावेळीदेखील असंच काहीसं झालं आहे.

सध्या पाकिस्तानी चित्रपट 'लिजेंड ऑफ मौला जट' या चित्रपटाच्या भारतातील प्रदर्शनाबाबत चर्चा सुरू आहेत. पाकिस्तानी अभिनेते फवाद खान याचा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाकिस्तानासोबतच भारतातदेखील प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारलाच इशारा दिला आहे. सोबत राज ठाकरे यांनी मनसेच्या मागील काही आंदोलनाची आठवण चित्रपटगृहाच्या मालकांना करून दिली आहे.

पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे भारतात कशामुळे- राज ठाकरे यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले, "फवाद खान नावाच्या पाकिस्तानी अभिनेत्याचा, 'लिजेंड ऑफ मौला जट' नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी कलाकारांचे सिनेमे मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात?" असा प्रश्न मनसे अध्यक्षांनी उपस्थित केला.

हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर पाकिस्तान तगला-पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी पाकिस्तानमधील चित्रपट प्रदर्शनावर ठाम भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटलं "कलेला देशांच्या सीमा नसतात, हे सगळं इतर बाबतीत ठीक आहे. पण, पाकिस्तानच्या बाबतीत हे अजिबात चालू देणार नाही. हिंदुस्थानचा द्वेष या एकमेव मुद्द्यावर पाकिस्तान तगला आहे. अशा देशातील कलाकारांना इथे आणून नाचवणं, त्यांचे सिनेमे प्रदर्शित करून देणं हा काय प्रकार सुरू आहे?"

महाराष्ट्र सोडाच पण देशातील कुठल्याच राज्यात हा सिनेमा तिथल्या तिथल्या सरकारांनी प्रदर्शित होऊ नाही दिला पाहिजे. अर्थात बाकीच्या राज्यांनी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, हे नक्की - मनसे अध्यक्ष राज ठाकरे

सध्या तरी नम्रपणे आवाहन- "या आधी असे प्रसंग जेव्हा आले होते, तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं दिलेला दणका सगळ्यांना आठवत असेल. त्यामुळे थिएटर मालकांना सध्या तरी नम्रपणे आवाहन आहे, उगाच सिनेमा रिलीज करण्याच्या भानगडीत पडू नका. हा सिनेमा जेव्हा प्रदर्शित होणार आहे, त्याच्या आसपास नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. अशावेळेस कुठलाही संघर्ष महाराष्ट्रात व्हावा, अशी माझी इच्छा नाही. तशीच ती इच्छा राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांची पण नसेल. उगाच संघर्ष आम्हालाही नको आहे. त्यामुळे वेळीच पाऊलं उचलून हा सिनेमा आपल्याकडे प्रदर्शित होणार नाही हे पहावं," अशी भूमिका मांडत सरकारसह पोलीस प्रशासनाला कार्यवाही करण्याचं राज ठाकरेंनी आवाहन केलं आहे.

तर हे औदार्य महागात पडेल- राज ठाकरेंनी थिएटर मालकांना इशारा देताना मराठी सिनेमांना थिएटर उपलब्ध करून दिले नव्हते, याची आठवण करून दिली आहे. राज ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटले, "मराठी सिनेमांना थिएटर्स उपलब्ध करून देताना मागेपुढे करणाऱ्या थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या, तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये. कुठल्यातरी पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये, अशीच माझी इच्छा आहे. सरकार त्याकडे योग्य ते लक्ष देईल, याची मला खात्री आहे."

हेही वाचा-

  1. 'राजपुत्र' विधानसभेच्या रिंगणात? अंतिम निर्णयाची प्रतीक्षा - AMIT THACKERAY
  2. गणेश मंडळांच्या भेटीदरम्यान राज ठाकरेंच्या पायाला दुखापत; पुढील दौऱ्याचं काय? - Raj Thackeray Leg Injured

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.